घरमहा @२८८केज विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३२

केज विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३२

Subscribe

बीड जिल्ह्यातील केज (विधानसभा क्र. २३२) विधानसभा मतदारसंघ आहे.

बीड जिल्ह्यातील केज हा क्रमांक २३२ वा विधानसभा मतदारसंघ आहे. राज्यातील एक महत्त्वाचा आणि बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे. १९६२ पासून आतापर्यंत म्हणजे एकूण तेरा विधानसबा निवडणुकांमध्ये काँग्रेसने पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसने चार वेळा आणि भाजपने तीन वेळा तर अपक्षाने एक वेळा या मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. १९९० पासून २००९ पर्यंत मतदारसंघातून विमल मुंदडा या दोन वेळा भाजपाकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग पाच वेळा निवडून गेल्या होत्या. २०१२ मध्ये डॉ. विमल मुंदडा यांचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज साठे यांना निवडणुकीमध्ये उतरवलं आणि या निवडणुकीमध्ये २०१२ साली पृथ्वीराज साठे हे मुंदडा गटातून केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले.

मतदारसंघ क्रमांक – २३२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,७१,४७०

महिला – १,५०,६६०

एकूण मतदार – ३,२२,१३२

विद्यमान आमदार – प्रा. संगीत ठोंबरे, भाजप

२०१२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत पृथ्वीराज साठे यांना ८५ हजार ७५० मत मिळाली तर भाजपच्या संगीता ठोंबरे यांना ७७ हजार ४४४ मते मिळाली. शिक्षिका असलेल्या संगीता ठोंबरे यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघा नवीन होता. मात्र त्यांनी पहिल्याच निवडणुकीमध्ये ७७ मते मिळवली. या दरम्यान विमला मुंदडा यांच्या अकाली मृत्यूनंतर तयार झालेली सहानभूती असतानाही संगीता ठोंबरे यांनी पृथ्वीराज साठे यांना कडवी झुंज दिली. २०१४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संगीता ठोंबरे या भाजपकडून पुन्हा एकदा उमेदवार म्हणून पुढे आल्या. यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून विमल मुंदडा यांच्या सूनबाई आणि अक्षय मुंदडा यांच्या पत्नी नमिता मुंदडा यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले होते. मात्र २०१४ साली निवडणुकीमध्ये भाजपच्या संगीत ठोंबरे विजयी झाल्या.

sangita thombare
आमदार प्रा. संगीत ठोंबरे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रा. संगीत ठोंबरे, भाजप – १,०६,८३४

२) नमिता मुंदडा, राष्ट्रवादी – ६४,११३

३) डॉ. अंजली घाडगे, काँग्रेस – २३,०११

४) कल्पना नरहिरे, शिवसेना – ८,४६६

५) अॅड. माणिक आदमाने, बसपा – २,२२३

हे वाचा – ३९ – बीड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -