कळमनुरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९३

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी (विधानसभा क्र. ९३) विधानसभा मतदारसंघ आहे.

Hingoli
kalamnuri assembly constituency
कळमनुरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९३

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरुवातीपासूनच काँग्रेसने अधिराज्य गाजवले आहे. या मतदारसंघात मुस्लिम, आदिवासी, बंजारा, हटकर या समाजवर येथील राजकारण आधारीत आहे. मुस्लिम समाजाच्या मतावर काँग्रेसने चार वेळा मतदारसंघावर सत्ता मिळवली आहे. आदिवासी समाजाची मतांवर माकपचे विठ्ठल नाईक यांनी देखील चार वेळा मतदारसंघात विजय मिळवला होता.
काँग्रेसचे विद्यमान आमदार संतोष टारफे हे आदिवासी समाजाचे आहेत. मात्र आदिवासी समाजाला तसेच इतर समाजाला देखील पुरेशा सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी, भाजप आणि शिवसेना या मतदारसंघात जोर लावत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघात फारसे प्राबल्य नाही.

मतदारसंघ क्रमांक – ९३

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५०,३६४
महिला – १,३२,८५९
एकूण मतदान – २,८३,२२३

विद्यमान आमदार – संतोष टारफे, काँग्रेस

संतोष टारफे हे २०१४ साली पहिल्यांदाच कळमनुरी मतदारसंघातून निवडून आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा संतोष टारफेच उमेदवार म्हणून रिंगणात उतरतील, अशी शक्यता आहे. संतोष टारफे यांच्याविरोधात मतदारसंघात बरीच नाराजी असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने यंदाची निवडणूक अवघड जाईल, असे चित्र आहे. संतोष टारफे हे २०१० पासून महाराष्ट्र राज्य आदिवासी युवक कल्याण संघाचे अध्यक्ष आहेत.

Santosh Tarfe
आमदार संतोष तरफे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. संतोष टारफे, काँग्रेस – ६७,१०४
२) गजानन घुगे, शिवसेना – ५६,५६८
३) अॅड. शिवाजी माने, राष्ट्रवादी – ३८,०८५
४) अॅड. माधवराव नाईक, रासप – १७,४७४
५) सुनील ऊडकिणे, मनसे – १,६२३


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ