घरमहा @२८८ कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६०

 कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६०

Subscribe

 सातारा जिल्ह्यातील कराड (विधानसभा क्र. २६०) विधानसभा मतदारसंघ आहे.

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासुन १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.


मतदारसंघ क्रमांक – २६०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १४,३६,७६
महिला – १३,२४,७७

- Advertisement -

एकूण मतदार – २७,६१,५३


विद्यमान आमदार – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस

prithviraj chavan

पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म इंदूरमध्ये मराठी कुटुंबात झाला. त्यांचे आईवडीलही राजकारणात होते. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण आणि आई प्रेमलाताई चव्हाण हे दोघेही काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. त्यामुळे राजकारणाचे बाळकडू पृथ्वीराज यांना लहानपणापासूनच मिळालेले. त्यांचं सातवीपर्यंतचं शिक्षण क-हाडच्या नगरपालिका शाळेत तर त्यापुढील शिक्षण दिल्लीत झालं. चव्हाणांनी बिट्स पिलानी येथून त्यांनी बी.ई. (ऑनर्स) ही पदवी मिळवली आणि त्यानंतर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून एम.एस. ही पदवी मिळवली. अमेरिकेत काही काळ काम केल्यानंतर ते भारतात परतले. त्यानंतर एअरोनॉटिकल क्षेत्रात त्यांनी काही काळ नोकरीही केली. राजीव गांधींच्या आग्रहाखातर पृथ्वीराज यांनी सक्रिय़ राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाचा कार्यभार समर्थपणे सांभाळला.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

१) पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस – ७६,८३१
२)विलासराव उंडाळकर ,अपक्ष – ६०,४१३
३)अतुल भोसले,बीजेपी – ५८,६२१
४) अजिंक्य पाटील,शिवसेना – २,३७३


हे वाचासातारा विधानसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -