घरमहा @२८८करवीर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७५

करवीर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७५

Subscribe

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर (विधानसभा क्र. २७५) हा विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

करवीर हा कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका आहे. या तालुक्यात १२१ गावांचा समावेश होतो. या गावांमध्ये विविध सरकारी उपाययोजना असल्या तरी गावांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रदुषणाचा प्रश्न कायम आहे.

मतदारसंघ क्रमांक – २७५

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरूष – १,५२,०२४
महिला – १,३६,७५९
एकूण – २,८८,७८५

- Advertisement -

विद्यमान आमदार – चंद्रदीप शशिकांत नरके

karvir mla chandradeep narke.jpg 1
विद्यमान आमदार – चंद्रदीप शशिकांत नरके

चंद्रदीप शशिकांत नरके हे करवीर या विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २० ऑक्टोबर १९६७ रोजी कोल्हापूरमध्ये चंद्रदीप नरके यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचन आणि फुटबॉल खेळण्याची आवड आहे. मागील निवडणूकीत त्यांनी काँग्रेसच्या पी. एन. पाटील यांचा पराभव केला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) चंद्रदीप शशिकांत नरके, शिवसेना – १,०७,९९८
२) पी. एन. पाटील, काँग्रेस – १,०७,२८८
३) राजू सूर्यवंशी, जनसुराज्य – १८,९६४
४) के. एस. चौगले, भाजप – ५,२५८
५) अमित पाटील, मनसे – १,४३८

- Advertisement -

हेही वाचा – कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७४

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -