घरमहा @२८८खामगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६

खामगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६

Subscribe

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव (विधानसभा क्र. २६) विधानसभा मतदारसंघ आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हा क्रमांक २६ वा विधानसभा मतदारसंघ आहे. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भावनिक वक्तव्यांना मतदारांनी प्रतिसाद देत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आकाश फुंडकर यांच्या स्वाधीन केला. मात्र या निवडणुकीत भारीपची मोठी भूमिका निर्णायक राहिली. यंदाही युती-आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी चुरशीची तिरंगी लढत होणार का, वंचित बहुजन आघाडीची भूमिका परिणामकारक ठरणार का, तर यावेळची निवडणूक ही स्थानिक नेत्यांसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.

मतदारसंघ क्रमांक – २६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,३९,७१८
महिला – १,२३,३८५

- Advertisement -

एकूण मतदार – १,९५,९७६

विद्यमान आमदार – आकाश फुंडकर, भाजप

बालपणापासून वडिलांकडून समाजकारण आणि राजकारणाचे धडे आत्मसात करून खामगाव मतदारसंघाची वाटचाल विकास पर्वाकडे नेण्याचे कार्य भाजपचे युवा आमदार आकाश फुंडकर करत आले आहेत. आमदार म्हणून आकाश फुंडकर यांची ही पहिली टर्म असली तरी त्यांची आजवरची वाटचाल ही राजकारणात नव्याने दाखल होणाऱ्या युवाशक्तीसाठी प्रेरणादायीच आहे. वडील राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्या तालमीत समाजकारण आणि राजकारणाचे धडे त्यांनी आत्मसात केले. आकाश फुंडकर हे फडणवीस सरकारमध्ये युवा चेहरा आहेत. पुणे येथे विधी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. गेल्या तीन वर्षात त्यांची मतदारसंघातील कामगिरी दमदार राहिली असून जलयुक्त शिवार, सिंचन या त्यांनी मोठी कामे केली आहेत.

akash-fundkar
आमदार आकाश फुंडकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) आकाश फुंडकर, भाजप – ७१,८१९

२) दिलीपकुमार सानंदा, काँग्रेस – ६४,७५८

३) अशोक सोनोने, बीबीएम – ४७,५४१

४) नाना कोकरे, राष्ट्रवादी – ४,४३२



हे वाचा – बुलढाणा लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -