घरमहा @२८८खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९७

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९७

Subscribe

पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी हा (विधानसभा क्र. १९७) विधानसभा मतदारसंघ आहे.

१९७ क्रमांकाचा खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३५४ मतदान केंद्र आहेत. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र या मतदारसंघात बदलाचे वारे आले आणि मोठा विरोधाचा डोंगर राष्ट्रवादी काँग्रेस समोर उभा राहिला आणि पहिल्यांदाच शिवसेनेचे आमदार सुरेश गोंरेना निवडून दिले. खेड तालुक्‍यात शिवसेनेचा पहिल्यांदा आमदार होण्याचा मान आमदार सुरेश गोरे यांना मिळला. मात्र यातून संपूर्ण तालुक्यात राजकीय समीकरणे बदलत गेली.

मतदारसंघ क्रमांक – १९७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – २,३३,६३६

- Advertisement -

महिला – १,७४,४८४

एकूण मतदार – ४,०८,१३९


विद्यमान आमदार – सुरेश नामदेव गोरे

सुरेश नामदेव गोरे हे शिवसेनेचे आमदार असून २०१४ साली १,०३,२०७ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहित हे उभे होते. यानंतर ऑक्टोबर, २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवड करण्यात आली होती. राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या सुरेश नामदेव गोरे यांनी १,२०,२०७ एवढी मते घेत विजय मिळवला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते हे होते. त्यांना ७०, ४८९ मते मिळाली आणि त्यांचा ३२,७१८ मतांनी पराभव झाला. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर भाजपचे शरद बुट्टे- पाटील, चौथ्या स्थानावर मनसेचे समीर थिगळे आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसच्या श्रीमती वंदना सातपूते या होते.

 


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • सुरेश नामदेव गोरे , शिवसेना – १,२०,२०७
  • दिलीप मोहिते, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ७०, ४८९
  • शरद बुट्टे- पाटील, भारतीय जनता पक्ष – १६,५५४
  • समीर थिगळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १, ९७४
  • श्रीमती वंदना सातपूते, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – १,७६५

नोटा – १,६९५

मतदानाची टक्केवारी – ५१.५३%


हेही वाचा – शिरुर लोकसभा मतदारसंघ

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -