घरमहा @२८८कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६९

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६९

Subscribe

कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघ हा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील सिंधूदुर्ग जिल्ह्यातील एक प्रमुख मतदार संघ आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कुडाळ-मालवण हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील मालवण किनारपट्टीवर जगभरातील पर्यटक येतात. पण पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची वानवा येथे आढळते. या मतदार संघात मिश्र स्वरूपातील मतदार असले तरी मच्छीमार समाजाचा प्रभाव या मतदारसंघावर दिसून येतो.

मतदारसंघ क्रमांक – २६९

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरूष – १,००,७१३
महिला – १,०४,०९२
एकूण – २,०४,८०५

- Advertisement -

विद्यमान आमदार – वैभव विजय नाईक

vaibhav naik
विद्यमान आमदार वैभव नाईक

कुडाळ-मालवण मतदारसंघाचे वैभव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी काँग्रेसच्या नारायण राणे या मातब्बर नेत्याचा दारूण पराभव केला. वैभव नाईक हे उच्चशिक्षित असून त्यांना वाचन आणि सामाजिक कार्याची आवड आहे.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) वैभव विजय नाईक, शिवसेना – ७०,५८२
२) नारायण राणे, काँग्रेस – ६०,२०६
३) विष्णू मोंडकर, भाजप – ४,८१९
४) पुष्पसेन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस – २,६९२
५) रविंद्र कसाळकर, बसपा – १,०७१


हेही वाचा – कणकवली विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६८

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -