घरमहा @२८८लातूर शहर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३५

लातूर शहर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३५

Subscribe

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर (विधानसभा क्र. २३५) विधानसभा मतदारसंघ आहे.

लातूर जिल्ह्यातील लातूर शहर हा क्रमांक २३५ वा विधानसभा मतदारसंघ आहे. लातूर हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघामध्ये सध्या लातूर जिल्ह्यामधील ५ आणि नांदेड जिल्ह्यामधील १ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. लातूर महाराष्टाच्या मराठवाड्यामधील औरंगाबाद विभागातील एक जिल्हा आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघ पश्चिम भारतातील महाराष्ट्र राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ लातूर जिल्ह्यात आहे. २००८ मध्ये विधानसभेच्या विधानसभेच्या परिसीमा नंतर, लातूर विधानसभा मतदारसंघ लातूर शहर आणि लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये विभागला गेला. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी सर्वात मजबूत पक्ष आहे.

मतदारसंघ क्रमांक – २३५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,७४,०७६

महिला – १,५३,९२७

एकूण मतदार – ३,२८,००३

विद्यमान आमदार – अमित देशमुख, काँग्रेस

लातूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन शहर व ग्रामीण अशा दोन मतदारसंघात करण्यात आल्यानंतर लातूर शहराचे गेल्या दोन टर्मपासून अमित देशमुख हे नेतृत्व करत आहेत. त्यापूर्वी या मतदारसंघात केशवराव सोनावणे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येकी दोनवेळा तसेच विलासराव देशमुख यांनी १९९५ वगळता पच वेळा विधानसभेत लातूरचे प्रतिनिधित्व केले आहे. शिवाजी पाटील कव्हेकर यांनाही एकदा मतदारांकडून कौल मिळाला होता. भाजपाकडे अमित देशमुख यांच्या विरोधात सध्या सक्षम उमेदवारच नाही. मात्र पालकमंत्री संभाजीराव राटील निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याची तयारी केली आहे. त्यामुळे यावेळी अमित देशमुख यांच्याकरता धोक्याची घंटा वाजत असल्याचे म्हटले जात आहे.

amit deshmukh
आमदार अमित देशमुख

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमित देशमुख, काँग्रेस – १,१९,६५६

२) शैलेश लाहोटी, भाजप – ७०,१९१

३) मुर्तजखाँ पठाण, राष्ट्रवादी – ४,०४७

४) पप्पूभाई श्रीपाद कुलकर्णी – २,३२३

५) रघुनाथ बनसोडे, बसपा – २,२०२

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -