घरमहा @२८८लोहा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८८

लोहा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८८

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील लोहा (विधानसभा क्र. ८८) विधानसभा मतदारसंघ आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा हा क्रमांक ८८ वा विधानसभा मतदारसंघ आहे. लोहा विधानसभा मतदारसंघा नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघा मानला जातो. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस अशीच लढाई या मतदारसंघात होत असे. एकेकाळी विधानभवन गाजवून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे.

मतदारसंघ क्रमांक – ८८

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,३५,१९३

महिला – १,२३,९८५

एकूण मतदार – २५,९१,७७९

विद्यमान आमदार – प्रतापराव चिखलीकर, शिवसेना

२००४ मध्ये या मतदारसंघात अपक्ष म्हणून प्रताप (पाटील) चिखलीकर हे पहिल्यांदा निवडून आले होते. तिथून प्रताप चिखलीकर यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या सुरुवात झाली. त्यानंतर २००९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरअण्णा धोंडगे हे विजयी झाले होते. धोंडगे यांनी प्रताप चिखलीकर यांचा केवळ ९ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर २०१४ साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रताप चिखलीकर आणि भाजपकडून मुक्तेश्वर धोंडगे मैदानात होते. यावेळी ४५ हजाराचा मताधिक्य घेत प्रताप चिखलीकर विजयी झाले होते.

prataprao chikhalikar
आमदार प्रतापराव चिखलीकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रतापराव चिखलीकर, शिवसेना – ९२,४३५

२) मुक्तेश्वर धोंडगे, भाजप – ४६,९४९

३) शंकरान्ना धोंडगे, राष्ट्रवादी – २९,२९४

४) रोहिदास चव्हाण, मनसे – ६,५६८

५) श्याम तेलंग, काँग्रेस – ५,३१२

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -