घरमहा @२८८माहीम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८१

माहीम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८१

Subscribe

माहीम (विधानसभा क्र. १८१) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मूळ मुंबई आणि पूर्वीच्या गिरणी कामगारांच्या वसाहतींचा भाग म्हणून माहीम ओळखला जातो. त्यामुळे इथे साहजिकच मराठी भाषिकांचं प्रमाण अधिक आहे. आणि त्यामुळेच शिवसेनेचा इथे कायम वरचष्मा राहिला आहे. १९९०पासून २०१४पर्यंत झालेल्या ६ विधानसभा निवडणुकांमध्ये २००९चा अपवाद वगळता इथे शिवसेनेनंच विजय मिळवला आहे. २००९मध्ये देखील मनसेचाच उमेदवार इथे निवडून आला होता. शिवसेनेचे सुरेश गंभीर सलग तीन निवडणुका इथे जिंकले होते. या मतदारसंघात एकूण २४७ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,१८,६७०
महिला – १,१३,८७८

- Advertisement -

एकूण मतदार – २,३२,५६६


sada sarvankar
सदा सरवणकर

विद्यमान आमदार – सदा सरवणकर, शिवसेना

तीन वेळा नगरसेवक राहिलेले सदा सरवणकर २००४मध्ये देखील आमदार म्हणून निवडून आले होते. नगरसेवक असताना त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्षपद देखील भूषवलं आहे. २००९मध्ये शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, या निवडणुकीत त्यांचा मनसेचे नितीन सरदेसाई यांनी पराभव केला. त्यानंतर २०१२मध्ये ते पुन्हा शिवसेनेत आले आणि २०१४मध्ये विधानसभा निवडणूक लढवत जिंकून देखील आले. २०१६मध्ये सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उचलल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वाद निर्माण झाला होता.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सदा सरवणकर, शिवसेना – ४६,२९१
२) नितीन सरदेसाई, मनसे – ४०,३५०
३) विलास आंबेकर, भाजप – ३३,४४६
४) प्रवीण नाईक, काँग्रेस – ११,९१७
५) नोटा – १९१८

मतदानाची टक्केवारी – ५८.६० %


हेही वाचा – मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -