घरमहा @२८८मुखेड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९१

मुखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९१

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील मुखेड (विधानसभा क्र. ९१) विधानसभा मतदारसंघ आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेड हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. २०१४ साली मुखेड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे गोविंद राठोड निवडून आले होते. मात्र आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच मुंबईला येत असताना त्यांचे देवगिरी एक्सप्रेसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर २०१५ साली या मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीत राठोड यांचे पुत्र डॉ. तुषार राठोठ यांचा विजय झाला.

मुखेड मतदारसंघात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. मराठवाड्यातील इतर मतदारसंघाप्रमाणे येथे उद्योगांची वाणवा आहे. शेतीसाठीही सिंचनाच्या पुरेशा सोयी-सुविधा नाहीत. त्यातच दर उन्हाळ्यात येथे दुष्काळाच्या झळा बसत असतात. दुष्काळामुळे मतदारसंघातील तरूण मोठ्या प्रमाणावर शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरीत होतात.

- Advertisement -

२००९ सालापर्यंत मुखेड हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता. २००९ पासून तो खुला करण्यात आला. २००९ साली पहिल्यांदा इथे काँग्रेसचे हनुमंत पाटील विजयी झाले होते. याच काळात अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री होते. मात्र तरिही मुखेडचा फारसा विकास होऊ शकला नाही. त्यामुळेच २०१४ साली आणि त्यानंतर पोटनिवडणुकीतही मतदारांनी भाजपला आपला कौल दिला.

मतदारसंघ क्रमांक – ९१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४३,०२२
महिला – १,३१,९३७
एकूण मतदान – २,७४,९६०

विद्यमान आमदार – डॉ. तुषार राठोड

माजी आमदार गोविंद राठोड यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र डॉ. तुषार राठोड निवडून आले. राठोड हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. गोविंद राठोड यांच्या मृत्यूमुळे मतदारसंगात डॉ. तुषार यांच्याबाजूने मतदारांमध्ये सहानुभूतिची लाट होती. मात्र प्रत्यक्ष मतदानात सहानुभूती दिसली नाही. आपल्या वडिलांपेक्षाही डॉ. तुषार यांना १८ हजार कमी मते पडली.

आगामी विधानसभा निवडणूक डॉ. तुषार राठोड यांच्यासाठी अवघड मानली जाते. मुळातच राजकारणी नसल्यामुळे त्यांचा जनसंपर्क फारसा नाही. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला जिंकून देण्यात त्यांनी फारसा उत्साह दाखवला नव्हता, ही बाबा देखील स्थानिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवली आहे. तसेच यावेळी भाजपकडून मुखेडची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे.

MLA Tushar Rathod BJP Mukhed
आमदार डॉ. तुषार राठोड

विधानसभा निवडणूक २०१५ निकाल (पोटनिवडणूक)

१) डॉ. तुषार राठोड, भाजप – १,००,३१९
२) हनुमंत बेटमोगरेकर, काँग्रेस – ५३,०७१
३) आजमोद्दीन हाफजीसाहब, एमआयएम – १,१४५


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -