घरमहा @२८८मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ - म.क्र.२०

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ – म.क्र.२०

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर (विधानसभा क्र.२०) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. मुक्ताईनगर मतदारसंघ लेवा पाटीदार बहुल समाज आहे. मात्र मराठा आणि कोळी समाजाचेही तेवढेच प्राबल्य आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंना स्वपक्षातील नेते, कार्यकर्ते कितपत मदत करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. यंदा आ. एकनाथराव खड्सेंसह त्यांच्या कन्या एड.रोहिणी खडसे, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर हे भाजपाकडून इच्छुक असल्याचे चित्र असून शिवसेनेकडून चंद्रकात पाटील यांच्याशिवाय कोणी अद्याप इच्छा व्यक्त केलेले नाही. कॉंग्रेस पक्षाचे जगदीश पाटील, एस.ए.भोई, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून एड.रविंद्र पाटील, विनोद तराळ, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर, संतोष बोदडे यांची नावे दिसत आहेत.

आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदार संख्या
पुरुष – १,४९,५६१
महिला – १,४०,०७७
तृतीयपंथी – १
एकुण – २,८९,६३९

विद्यमान आमदार – एकनाथ खडसे, भाजप

जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात ज्यांचा वाटा राहिला आहे अशांपैकी एक महत्वाची व्यक्ती म्हणून आ. खडसे आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत २०१४ साली भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली. एकनाथराव खडसें विरुद्ध शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील अशी लढत झाली होती. सुमारे १० हजार मतांच्या फरकाने आ.खडसे विजयी झाले होते. पाचवेळा निवडून आलेल्या खडसेंना चंद्रकांत पाटील यांनी कडवी झुंज देत लढत दिली होती. पक्षांतर्गत कारवाया आणि गिरीश महाजनांच्या नेतृत्वाचा उदय झाल्याने खडसे पक्षात मागे पडले आहेत. यावेळी स्वताची उमेदवारी मिळणेदेखील खडसेंसाठीमोठे आव्हान असल्याचे पक्षात बोलले जात आहे. खडसे यांनी स्वत: लढण्याची तयारी दाखविल्यास जागा शिवसेनेला सोडण्याची खेळी देखील भाजपा खेळण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास खडसेंना थांबविण्यासाठी भाजपकडूनच शिवसेनेला रसद पुरविली जाऊ शकते असे बोलले जात आहे. शिवसेनेचीही येथे चांगलीच ताकद आहे. या मतदारसंघातही गिरीश महाजन यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

एकनाथ खडसे

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ आमदार एकनाथ खडसे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

एकनाथ खडसे – भाजपा – ८५६५७
चंद्रकांत निंबाजी पाटील – शिवसेना – ७५९४९
अरुण पांडुरंग पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस – ६४९९


हे देखील वाचा – ४- रावेर लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -