घरमहा @२८८मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १८६

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १८६

Subscribe

मुंबादेवी (विधानसभा क्र. १८६) हा मुंबई शहरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

प्रामुख्याने मुस्लीम बहुल असलेल्या या मतदारसंघात व्यावसायिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. लघु आणि मध्यम उद्योगधंदे हे इथल्या मतदारांचं प्रमुख उत्पन्नाचं साधन आहे. मुंबादेवी मंदिराच्या नावावरून या भागाचं नाव मुंबादेवी पडलं. मात्र, हे मंदिर या मतदारसंघाच्या बाहेर आहे. भाजपचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित २००४पर्यंत या मतदारसंघातून सलग ४ वेळा निवडून आले होते. त्यानंतर मात्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसनं इथे यश मिळवलं आहे. या मतदारसंघात एकूण २४२ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १८६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,३२,८६०
महिला – १,०४,८७५

- Advertisement -

एकूण मतदार – २,३७,७४३


amin patel
अमिन पटेल

विद्यमान आमदार – अमिन पटेल, काँग्रेस

मुंबई महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम पाहिलेले अमिन पटेल सुरुवातीपासूनच काँग्रेसचे मुंबईतील निष्ठावान म्हणून गणले जातात. २००९ आणि २०१४ अशा २ सलग विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अनुक्रमे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांना धूळ चारत विजय मिळवला आहे.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमिन पटेल, काँग्रेस – ३९,१८८
२) अतुल शाह, भाजप – ३०,६७५
३) मोहम्मद रफी, एमआयएम – १६,१६५
४) यशवंत साळेकर, शिवसेना – १५,४७९
५) इम्तियाज अनीस, मनसे – ३६०१

नोटा – ८०२

मतदानाची टक्केवारी – ४६.३७ %


हेही वाचा – दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -