घरमहा @२८८मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३२

मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३२

Subscribe

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर (विधानसभा क्र. ३२) विधानसभा मतदारसंघ आहे.

अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर हा क्रमांक ३२ वा विधानसभा मतदारसंघ आहे. मुर्तिजापूर हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेचा एकमेव राखीव असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या मतदार संघात दोन अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नाही, असे पूर्वी बोलले जात होते. परंतू १९९० च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या अकोला पॅटर्न आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला आणि काँग्रेसही इथून हद्दपार झाली आजपर्यंत परत आली नाही. १९९५ पासून या मतदारसंघावर सलग भाजपचे वर्चस्व आहे. २००४ चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवला आहे.

मतदारसंघ क्रमांक – ३२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५२,४१९

महिला – १,४०,१८१

एकूण मतदार – २,९२,६०४

विद्यमान आमदार – हरीष मारोतीआप्पा पिंपळे, भाजप

२००९ आणि २०१४ असे सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचे हरीश पिंपळे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला. २०१४ मध्ये त्यांनी १२,८८८ मतांनी भारिप-बहूजन महासंघाचा पराभव केला. परंतू सध्या आमदार पिंपळे यांना पक्षांतर्गत मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सध्याही भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरू झाली आहे.

harish pimple
आमदार हरीष मारोतीआप्पा पिंपळे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) हरीष मारोतीआप्पा पिंपळे, भाजप – ५४,२२६

२) राहुल डोंगरे, भारिप – ४१,३३८

३) महादेव गव्हाळे, शिवसेना – २४,४८६

४) श्रावण इंगळे, काँग्रेस – १८,०४४

५) डॉ. सुधीर विल्हेकर, राष्ट्रवादी – ७,५२०

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -