नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५४

नागपूर जिल्ह्यात नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ५४) आहे.

Nagpur
nagpur east assembly constituency
नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५४

नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याचा एक भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. या मतदारसंघाला काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २००९ आणि २०१४ची विधानसभा निवडणूक वगळता या मतदारसंघात आतापर्यंत सर्व निवडणूका काँग्रेसनेच जिंकल्या आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ५४
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष मतदार – १,७२,८२७
महिला मतदार – १,५४,५६८
एकूण मतदार – ३,२७,४००

विद्यमान आमदार – कृष्णा पंचमजी खोपडे, भाजप

mla krushna khopade
विद्यमान आमदार कृष्णा खोपडे

कृष्णा खोपडे हे नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. कृष्णा यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षातून काने केली. ते १९८७ ते १९९१ काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. १९९२ ते २००३ ते पूर्व नागपूर भाजप-युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. त्यानंतरव ते शहर सचिवही बनले. १९९२ ते २०१२ ते नगरसेवक होते. १९९५ ते १९९६ ते उपमहापौर होते. २००९ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत ते विजयी झाले. त्यानंतर २०१४ च्या ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) कृष्णा खोपडे, भाजप – ९१,१३६
२) अभिजित वंजारी, काँग्रेस – ५०,५२२
३) दिलीप रंगारी, बसप -१२,१६४
४) दुनेश्वर पेठे, काँग्रेस – ८,०६१
५) अजय दलाल, शिवसेना – ७,४८१


हेही वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ