नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५३

नागपूर जिल्ह्यात नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ५३) आहे.

Nagpur
nagpur south assembly constituency
नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५३

नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा नागपूर जिल्ह्याचा एक भाग आहे. हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. १९९५, १९९९ आणि २०१४ सालाची निवडणूक वगळता इतर सर्व विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा या मतदारसंघातून विजय झाला आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५३
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष मतदार – १,७४,६११
महिला मतदार – १,६७,६५६
एकूण मतदार – ३,४२,२६८

विद्यमान आमदार – सुधाकर विठ्ठलराव कोहळे, भाजप

mla sudhakar kohale
विद्यमान आमदार सुधाकर कोहळे

सुधाकर कोहळे नागपूर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २००७ साली ते नगरसेवक झाले होते. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा भरघोस मतांनी विजय झाला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुधाकर कोहळे, भाजप – ८१,२२४
२) सतिश चतुर्वेदी, काँग्रेस – ३८,०१०
३) सत्यभाभा लोखंडे, बसप – २३,१५६
४) शेखर सावरबांदे, अपक्ष – १५,१०७
५) किरण पांडव, शिवसेना – १३,८६३


हेही वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ