घरमहा @२८८नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५२

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५२

Subscribe

नागपूर जिल्ह्यात नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा (विधानसभा क्र. ५२ ) मतदारसंघ आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघ अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २००९ साली याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा या मतदारसंघातून निवडून आले.

मतदारसंघ क्रमांक – ५२
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष मतदार – १,७३,१९३
महिला मतदार – १,६८,०९४
एकूण मतदार – ३,४१,३००

विद्यमान आमदार – देवेंद्र फडणवीस, भाजप

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते. फडणवीस यांनी १९८७ पासून सामाजिक कार्याला सुरुवात केली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. त्याचबरोबर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांनी बरेच कामे केली आहेत. १९८९ साली ते नागपूरच्या धर्मपेठवार्डचे भाजपचे वार्ड अध्यक्ष बनले. १९९२-९५ भाजप युवा मोर्चा नागपूर शहरचे अध्यक्ष होते. १९९५ ते २००४ ते महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते. २००४ ते २००९ आणि २००९ ते २०१४ ते भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष होते. देवेंद्र फडणवीस १९९२ आणि १९९७ ला ते नागपूर मनपा सदस्य होते. १९९७ साली ते नागपूर महापालिकेचे महापौर होते. १९९८ साली त्यांची मेअर इन कौन्सिल पद्धतीअंतर्गत महाराष्ट्रातील प्रथम महापौर म्हणून निवड झाली. १९९९ पासून आतापर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांच्या कुशल कामगिरीमुळे त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

- Advertisement -
devendra-fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) देवेंद्र फडणवीस, भाजप – १,१३,९१८
२) प्रफुल्ल गुडदे-पाटील, काँग्रेस – ५४,९७६
३) डॉ. राजेंद्र पडोळे, बसप -१६,५४०
४) पंजू तोतवानी, शिवसेना – २,७६७
५) दिलीप पाणकुडे, राष्ट्रवादी – १,०५५


हेही वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -