घरमहा @२८८नायगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८९

नायगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८९

Subscribe

नांदेड जिल्ह्यातील नायगाव (विधानसभा क्र. ८९) विधानसभा मतदारसंघ आहे.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. सध्याचा नायगाव विधानसभा मतदारसंघ तयार होण्यापूर्वी नायगाव तालुक्याचा काही भाग मुखेड आणि बिलोली या मतदारसंघात समाविष्ट होता. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेत भोकर मतदार संघातील उमरी आणि धर्माबाद हे दोन तालुके नायगाव विधानसभा मतदारसंघाला जोडून नवीन नायगाव विधानसभा मतदारसंघ २००९ साली अस्तित्वात आला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. मात्र वसंत चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले. त्यानंतर २०१४ मध्ये चव्हाण यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. २०१४ मध्ये युती आणि आघाडी तुटल्यामुळे काँग्रेसचे वसंतराव चव्हाण, राष्ट्रवादीचे बापूसाहेब गोरठेकर आणि भाजपचे राजेश पवार यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली.

मतदारसंघातील बहुतांश शेती ही कोरडवाहू आहे. त्यामुळं शेतकरी हे पावसाच्या आशेवर जगतात. सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर अशा पिकांवर शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेला नायगाव हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरु केले आहेत. मागच्या पाच वर्षांत भाजपने इथे संघटनात्मक बांधणी केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील-खतगावकर यांनी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये खेचून स्वतःच्या सुनेसाठी उमेदवारीची तयारी सुरु केली आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ८९

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,४३,७२४
महिला – १,३६,३६८
एकूण मतदान – २,८०,०९३

विद्यमान आमदार – वसंतराव चव्हाण, काँग्रेस

वसंतराव चव्हाण हे नायगावचे २२ वर्ष सरपंच होते. जिल्हा परिषदेवर देखील ते दोन वेळा निवडून आले होते. २००२ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर नियुक्ती केली होती. मात्र २००९ मध्ये राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय देखील मिळवला. २०१४ साली अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांना काँग्रेसकडून तिकीट दिले.

मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात वसंतराव चव्हाण यांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली. २०१४ सालच्या मोदी लाटेचा या मतदारसंघात बराच फरक जाणवला. नवखे असणाऱ्या भाजपच्या राजेश पवारांनी येथे शेवटपर्यंत चांगलीच झुंज दिली. सलग दुसऱ्यांदा यावेळी बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव झाला. त्यासोबतच काँग्रेस-राष्ट्रवादीतील राजकीय वैमनस्य उफाळून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आ. वसंतराव चव्हाण हे काँग्रेसतर्फे रिंगणात राहणार आहेत.

MLA Vasant Chavan
आमदार वसंत चव्हाण

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) वसंतराव चव्हाण, काँग्रेस – ७१,०२०
२) राजेश पवार, भाजप – ६०,५९५
३) श्रीनिवास देशमुख, राष्ट्रवादी – ५७,२४७
४) सय्यद इस्माईल खाजामिया, बसपा – ३०९८
५) बाबाराव अंबडवार, शिवसेना – ३०८७


हे वाचा – नांदेड लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -