घरमहा @२८८नालासोपारा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३२

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३२

Subscribe

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (विधानसभा क्र. १३२) विधानसभा मतदारसंघ आहे.

पालघर जिल्ह्यातील नालासोपारा हा क्रमांक १३२ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ४०१ मतदान केंद्र आहेत. यंदाच्या नालासोपारा विधानसभा निवडणूकीवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कारण देखील तसच असून १९९० च्या दशकापासून वसई, विरार आणि नालासोपारा शहरावर हितेंद्र ठाकूरांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे २००९ साली वसई विधानसभेचे अडीच भाग झाल्यानंतर या तीनही विधानसभा हितेंद्र ठाकूरांकडे राहिल्या आहेत. २००९ ची वसई विधानसभेचा अपवाद वगळता सत्ता ठाकूरांच्या हाती राहिली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत थंड झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीही थंड पडली आहे.

मतदारसंघ क्रमांक – १३२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष –, १८, २२०

- Advertisement -

महिला –, ७७, ९७६

एकूण मतदार –, ९६, २४०


विद्यमान आमदार –  क्षितिज हितेंद्र ठाकूर

 

क्षितिज ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे आमदार असून त्यांनी २०१४ साली  १,१३,५६६ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे भाजप पक्षाचे राजन नाईक यांचा ५४,४९९ मतांनी पराभव केला होता. महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नेतृत्व केले आणि महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी म्हणून काम केले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत थंड झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीही थंड पडली आहे. नालासोपारा बालेकिल्ल्यातून बहुजन विकास आघाडी २५ हजार ५३५ मतांनी पिछाडीवर राहिली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या आशा वाढल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदणार असा आत्मविश्वास सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांना ठाकूरांच्या समोर उतरवले असल्याने चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • क्षितीज ठाकूर, बहुजन विकास आघाडी – १,१३,५६६
  • राजन नाईक , भाजप – ५९,०६७
  • शिरीष नाईक, शिवसेना – ४०,३२१
  • अशोक पेंढारी, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – ३, ८६०
  • विजय मांडवकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ३,८६०


नोटा – ३१२६

मतदानाची टक्केवारी – ६८.११ %


हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -