घरमहा @२८८नंदुरबार विधानसभा मतदार संघ - म. क्र. ३

नंदुरबार विधानसभा मतदार संघ – म. क्र. ३

Subscribe

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार (विधानसभा क्र.३) विधानसभा मतदारसंघ आहे.

गुजरात राज्याच्या सीमेवर असणारा नंदुरबार मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. केंद्र तसेच राज्याची निवडणुकीत या मतदार संघातुन काँग्रेसने आपला प्रचाराचा नारळ या जिल्हयातील दुर्गम भागातील गावांमधुन फोडला आहे. मतदारांनी देखील आपले मत इंदिरा गांधी यांच्या हाताला देऊन काँग्रेसबरोबर असणे पसंत केले. आतापावेतोचा निकाल बघता हा मतदार संघ दहा वर्ष वगळता काँग्रेसबरोबर राहीला आहे. पण, राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ विजयकुमार गावीत यांनी पक्षांतर करुन भाजपावासी झाल्यानंतर हा गड आता भाजपाच्या ताब्यात आहे. नंदुरबार मतदार संघात आदीवासी मतदार मोठया प्रमाणावर असुन शहर भागात राजपुत, मराठा, माळी असा मतदार आहे.

मतदार संघ क्रमांक 3

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण – अनुसुचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,७०,४२८
महीला १,६८,१८९
इतर ७
एकुण ३,३८,६२४

- Advertisement -

विदयमान आमदार – डॉ विजयकुमार गावित, भारतीय जनता पार्टी

नंदुरबार जिल्हयात वैदयकीय सेवा देत असतांना दांडगा जनसंपर्क आणि सर्व समाजातील युवा पिढीबरोबर असणारा संवाद पहाता १९९५ पासुन डॉ विजयकुमार गावीत यांनी राजकारणात प्रवेश केला. यावेळी त्यांना कोणत्याही पक्षाने उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढवुन काँग्रेसच्या या गडाला भगदाड पाडले. पण त्यानंतर १९९९,२००४ व २००९ या तिनही निवडणुका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंडयाखाली लढुन विजय मिळवला. या काळात त्यांनी आदीवासी विकास मंत्री पदावर काम केले. पण, त्यांच्यावर गैरप्रकार केल्याचे गंभिर आरोप झाले. यांनतर डॉ गावीत यांनी २०१४ मध्ये भारतीय जनता पार्टीमधे प्रवेश करुन ही निवडणुक जिंकली. याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांची मुलगी डॉ हिना गावीत यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. खा.डॉ.हिना गावीत या आता भाजपाच्या झेंडयाखाली सलग दोन वेळेस निवडुन गेल्या आहेत.

नंदुरबार मतदारसंघाचे आमदार विजयकुमार गावित

२०१४ मधील विधानसभा निवडणुकीतील स्थिती

डॉ. विजयकुमार गावीत – भारतीय जनता पार्टी – १,०१,३२८
कुणाल वसावे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ७४,७१०
विकास वळवी – राष्ट्रवादी – १,७८४
विरेंद्र वळवी –  शिवसेना – ८,५९८

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -