नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२४

नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य (विधानसभा क्र. १२४) विधानसभा मतदारसंघ आहे.

Nashik

नाशिक जिल्ह्यातील नाशिक मध्य हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेत नाशिक मध्य विधानससभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जुने नाशिक, अशोक स्तंभ, मुंबई नाका, इंदिरानगर परिसर हा भाग या मतदारसंघात येतो. संमिश्र घटकांचे लोक हे या मतदारसंघाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. जुने नाशिक भागामध्ये दलित आणि मुस्लिम मतदान जास्त आहे तर इंदिरानगर भागामध्ये मध्यमवर्गीय मतदान जास्त आहे आणि उर्वरित ठिकाणी उच्चभ्रु मतदार जास्त असल्याने समिश्र मतदारसंघ अशी ओळख आहे. विशेषतः मुस्लिम आणि दलित मतांचा प्रभाव या मतदारसंघवर जास्त आहे.

मतदारसंघ क्रमांक – १२४

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या

पुरुष : १,६३,५३०
महिला : १,५४,२६५
तृतीयपंथी : ५
एकूण मतदान ३,१७,८००

विद्यमान आमदार :प्रा. देवयानी फरांदे , भारतीय जनता पक्ष

राज्य विधानपरिषदेचे माजी उपसभापती ना.स.फरांदे यांच्या स्नुषा सौ. फरांदे यांनी १९९७ मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणूक लढविली. मात्र, त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा २००७ मध्ये त्यांनी विजय मिळवत २००९ मध्ये उपमहापौर पदापर्यंत मजल मारली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवत त्यांनी विधानभवनात प्रवेश केला.

नाशिकमध्य विधानसभा मतदारसंघ आमदार फरांदे

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

देवयानी फरांदे – भाजप – ६१,५४८
वसंत गीते – मनसे – ३३,२७६
अजय बोरस्ते – शिवसेना – २४,५४९
शाहू खैरे – कॉंग्रेस – २६,३९६
विनायक खैरे – राष्ट्रवादी कॉंग्रेस – ७०९५


हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ