घरमहा @२८८नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२३

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२३

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व (विधानसभा क्र. १२३) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. नाशिक जिल्हा उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. संतांची भूमी असलेल्या नाशिकमधील रामकुंड, पंचवटी परिसर यासोबतच नाशिकरोड भाग या मतदारसंघात येतो. मळे परिसर, झोपडपट्टी यातील मध्यमवर्गीयांसोबत मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्रेस कामगारांची मते निर्णायक ठरतील. साधारण ३ लाख १८ हजार लोकसंख्येचा हा मतदारसंघात कोणत्याही एका जातीच्या प्रभावात येत नसला तरी यामध्ये मराठा समाज तुलनेने अधीक आहे. पाठोपाठ दलित, वंजारी, गुजराथी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघात तब्बल ६३ छोट्या, मोठ्या जातींचा या मतदारसंघात समावेश आहे.

मतदारसंघ क्रमांक – १२३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,८४,७०७
महिला – १,६९,५९२
तृतीयपंथी – ४
एकूण मतदान – ३,५४,३०३

- Advertisement -

विद्यमान आमदार – बाळासाहेब सानप, भारतीय जनता पक्ष

भाजपचे आमदार बाळासाहेब सानप यांनी स्थानिक स्वराज्य संस्थापासून राजकारणाची सुरुवात केली. नाशिक महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे ते पहिले महापौर होते, २०१४ च्या विधानसभा निकालानंतर पक्षाने त्यांची शहराध्यक्ष पदी नेमणूक केली. त्यानंतर नाशिक महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपापासून ते सत्ता स्थापन करणे, पुढे महापौर ते स्थायी समिती सभापती अशी सर्वच महत्वाची पदे आपल्या मतदारसंघात खेचून आणत आपला वरचष्मा ठेवला. मात्र, या राजकीय खेळीने पक्षांतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याने पक्षात सानप विरोधी गट सक्रिय झाला. दरम्यानच्या काळात बरीच उलथापालथ झाल्याने सानप आणि पालकमंत्री महाजन यांच्यात निर्माण झालेली कटुता यामुळे या मतदारसंघात सानप यांना रोखण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आमदार बाळासाहेब सानप

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बाळासाहेब सानप, भाजपा – ७८,५५४
२) सूर्यकांत लवटे, शिवसेना – ३२,४४७
३) उद्धव निमसे, कॉंग्रेस – १९,४४२
४) देवीदास पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस – १२,९००
५) रमेश धोंगडे , मनसे – १२,४३७


हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -