घरमहा @२८८नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२५

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२५

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम (विधानसभा क्र. १२५) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. राज्यातल्या विधानसभा मतदारसंघांच्या फेररचनेत नाशिक पश्चिम विधानससभा मतदारसंघाची निर्मिती झाली. या मतदारसंघात सातपूर आणि अंबड या दोन औद्योगिक वसाहतींचा भाग येतो. कामगार वर्गाची वस्ती या भागाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. नाशिक जिल्ह्याच्या कसमादे पट्यातील (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा) आणि ज्याला खान्देश पट्टा म्हटले जाते त्या धुजभू म्हणजेच धुळे, जळगांव आणि भुसावळ या भागातील लाखो लोक नवीन नाशिक, सातपूर व अंबडच्या परिसरात स्थायिक झालेले आहेत. या ठिकाणी असलेल्या कामगार वसाहतीमधील मतदारांचा निर्णय हा निर्णायक समजला जातो. गेल्या काही वर्षापासून कसमादे मतावर मतदार संघाचे राजकीय समीकरण बदलत आहे. सुरवातीपासूनच हा भाग शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

मतदारसंघ क्रमांक : १२५

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण : खुला

मतदारांची संख्या

पुरुष : २,१६,२९३
महिला : १,८२,६३३
तृतीयपंथी : ०
एकूण मतदान : ३,९८,९२६

- Advertisement -

विद्यमान आमदार : सीमा हीरे, भारतीय जनता पक्ष

भारतीय जनता पक्षातर्फे २००२ पासून नगरसेविका म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. सलग तीन टर्म नगरसेविका असलेल्या सीमा हीरे यांनी स्थायी समिति सदस्या, महापालिका पश्चिम विभाग सभापति यासोबतच भाजप प्रदेश चिटणीस पद देखील त्यांनी भूषविले होते. सध्या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीवर सदस्य म्हणून कामकाज बघत आहेत. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे अशा बहुरंगी निवडणुकीत सीमा हिरे यांनी ३० हजार मतांनी विजयश्री खेचून आणत प्रस्थापितांना पराभवाची धूळ चारली. मोदी लाटेमुळे भाजप नगरसेविका सीमा हिरे मनपाच्या सभागृहातून थेट विधिमंडळात पोहोचल्या.

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आमदार हिरे

२०१४ विधानसभा निवडणूक निकाल

  1. सीमा हिरे – भाजप – ६७४८९
  2. सुधाकर बडगुजर – शिवसेना – ३७८१९
  3. शिवाजी चुंभळे – राष्ट्रवादी काँग्रेस – ३०२३६
  4. दशरथ पाटील – काँग्रेस- २१९८१
  5. डी. एल. कराड – भाकप – १६९७०
  6. नितीन भोसले – मनसे- ८७१२

हे देखील वाचा – नाशिक लोकसभा मतदारसंघ

एक प्रतिक्रिया

  1. *??जय भिम??*
    *सातपूर शहर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे.*
    *सातपूर,सिडकोत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव आहे त्यामुळे आता विधानसभेत युवकांना संधी द्यावी अशी मागणी युवकांना मध्ये होत आहे.बिपिन अण्णासाहेब कटारे यांचा युवकांना मध्ये दांडगा संपर्क असून,*
    *कायम जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असणारे आमचे मोठे बंधू ,आंबेडकरी चळवळीतील युवा नेतृत्व सक्रिय भिमसैनिक*
    *अभ्यासू ,कर्तृत्ववान, पदवीधर नेतृत्व बिपिन अण्णासाहेब कटारे यांना युवकांची पसंती असून पश्चिम विधानसभा मतदारसंघ त्यांनी लढविल्यास आम्ही मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत आहोत.*
    ??????????????
    *संधी देऊन बघा नक्कीच दिशा देणारे नेतृत्व आहे.*

    कार्यालय
    *?राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष?*

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -