घरमहा @२८८निफाड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२१

निफाड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १२१

Subscribe

नाशिक जिल्ह्यातील निफाड (विधानसभा क्र. १२१) विधानसभा मतदारसंघ आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड हा विधानसभा मतदारसंघ दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. द्राक्ष, बेदाणे आणि टोमॅटो यांची प्रमुख बाजारपेठ असलेला पिंपळगाव बसवंत हा भाग या मतदारसंघात येतो. निफाड तालुका आणि तालुक्यातील गावे सोबतच ओझर विमानतळ, हिंदुस्थान एरोनोटिक्स आदी कंपन्यांच्या वसाहती या मतदारसंघाचे वैशिष्ठ होय.

२००४च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता १९९५ पासून या मतदारसंघवर कायमच शिवसेनेचा भगवा दिसून येतो. मराठा बहुल असलेल्या या मतदारसंघात मात्र वंजारी आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरत आल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक : १२१

मतदारसंघ आरक्षण : खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष : १,३९,४०९
महिला : १,२९,९२९
तृतीयपंथी : ४
एकूण मतदान २,६९,३४२

विद्यमान आमदार : अनिल कदम, शिवसेना

२००२ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये ओझर गटामधून प्रवेश करत अनिल कदम यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. अनिल कदम यांचे काका १९९५ मध्ये रावसाहेब कदम यांनी विधानसभेमध्ये शिवसेनेच्या तिकीटावर प्रवेश केला होता. मात्र, साधारण दीड दोन वर्षातच त्यांचे अपघाती निधन झाल्याने निफाड मतदारसंघात पोटनिवडणूक होऊन मंदाकिनी कदम यांना निफाडने निवडून दिले. त्यानंतर १९९९ मध्ये देखील त्यांनी विजयश्री मिळवत निफाड मतदारसंघावर भगवा फडकावला.

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये मात्र मतदारांनी त्यांना नाकारून राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांना संधी दिली. त्यांची एक टर्म पूर्ण होताच मंदाकिनी कदम यांचे पुतणे अनिल कदम यांनी २००९ मध्ये दिलीप बनकर यांचा पराभव करत विधानभवनात प्रवेश केला. २०१४ मध्ये देखील त्यांनी बनकरांचा पराभव करत आपला गड राखला.

निफाड विधानसभा मतदारसंघ आमदार अनिल कदम

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

अनिल कदम – शिवसेना – ७८,१८६
दिलीप बनकर – राष्ट्रवादी कॉंग्रेस – ७४,२६५
वैकुंठ पाटील – भाजप – १८,०३१


हे ही वाचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -