घरमहा @२८८उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २४२

उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४२

Subscribe

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद (विधानसभा क्र. २४२) विधानसभा मतदारसंघ आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद हा क्रमांक २४२ वा विधानसभा मतदारसंघ आहे. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघावर नेहमी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणजेच माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. उस्मानाबाद विधानसभेवर डॉ. पाटील यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे विद्यमान आमदार आहेत. १९७८ ते २०१४ या काळातील २००९ मधील पराभव सोडता या मतदार संघावर डॉ. पद्मसिंह पाटील यांचे एकहाती वर्चस्व राहीले आहे. राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे १९७८ पासून सलग ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले असून तो जिल्ह्यातील एक विक्रमच आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी १६ हजार ९७४ मतांनी पराभव केला. मात्र त्याचा वचपा आमदार राणा यांनी २०१४ च्या निवडणुकीत काढत ओमराजे यांचा १० हजार ८०६ मतांनी पराभव केला. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात २००४ पासून डॉ. पद्मसिंह पाटील व कै. पवनराजे निंबाळकर या घराण्यात सत्ता संघर्ष सुरु झाला तो आजवरही सुरूच आहे.

मतदारसंघ क्रमांक – २४२

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,७५,२४०

महिला – १,५१,६९९

एकूण मतदार – ३,२६,९४२

विद्यमान आमदार – राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांना ८८ हजार ४६९ , शिवसेनेचे ओमराजे ७७ हजार ६६३ अशी मते पडली तर भाजपकडून संजय पाटील दुधगावकर व काँग्रेसकडून विश्वास शिंदे यांनी निवडणूक लढविली. शिवसेना व भाजपच्या मतात विभागणी झाल्याने राष्ट्रवादीचे राणा पाटील यांना आमदारकीची लॉटरी लागली . निवडणूक म्हणजे डॉ. पाटील व राजेनिंबाळकर परिवार सत्तासंघर्ष असे जणू या मतदार संघातील गणीत आहे . यंदाही तोच पॅटर्न पाहायला मिळणार आहे कारण ओमराजे आता खासदार असून ते पूर्ण ताकतीने डॉ. पाटील परिवाराला विजयापासून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसते.

rana jagjit sinha patil
आमदार राणा जगजितसिंह पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राणा जगजितसिंह पाटील, राष्ट्रवादी – ८८,४६९

२) ओम राजेनिंबाळकर, शिवसेना – ७७,६६३

३) संजय दुधगावकर, भाजप – २६,०८१

४) विश्वास शिंदे, काँग्रेस – ९,०८१

५) अकबर खान पठाण, एमआयएम – ४,५५५

हेवाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -