घरमहा @२८८पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ - म.क्र. १८

पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ – म.क्र. १८

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव (विधानसभा क्र.१८) विधानसभा मतदारसंघ आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव हा विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. जळगाव जिल्हा तसा शेतकऱ्यांचा, मजुरांचा, नोकरदारांचा आणि शिक्षक लोकांचा म्हणून प्रसिद्ध आहे. जळगाव शहराच्या दक्षिणेला हा मतदारसंघ आहे. पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये एकूण १०४ गावे येतात. पाचोरा तालुका एज्युकेशन सोसायटी यावर दिलीप वाघ यांचा वरचष्मा असल्याकारणाने त्यांचे नाव असल्याची चर्चा या ठिकाणी आहे. भडगाव नगरपरिषद आणि पाचोरा नगरपरिषद यांचा समावेश असल्याने नगराध्यक्षांचा कौल या मतदारसंघवर असेल.

मतदारसंघ केंद्र क्रमांक – १८

- Advertisement -

आरक्षण – खुला

मतदार संख्या

- Advertisement -

पुरुष – १,६३,२६२
महिला – १,४९,६९८
तृतीयपंथी – २
एकुण – ३,१२,९६२

विद्यमान आमदार – किशोर पाटील, शिवसेना

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे किशोर पाटील आमदार आहेत. दोन्ही तालुक्यात शिवसेनेचा चांगला जनसंपर्क आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते आर.ओ.पाटील कालवश झाले तरीही शिवसेनेची ताकद कमी झालेली मतदारसंघात दिसून येत नाही. त्यामुळे शिवसेनेचे किशोर पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून इच्छुक आहेत. ते यापूर्वी आमदार असताना विकासकामांच्या बळावर ते मतदान मागणार आहेत. त्यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरूच असून किशोर पाटील यांना पुन्हा मात देण्यासाठी ते तयार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडे या मतदारसंघात सक्षम दुसरा उमेदवार नसल्याने दिलीप वाघ यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

किशोर अप्पा पाटील – शिवसेना – ८७,५२०
दिलीप वाघ – राष्ट्रवादी – ५९,१७७
उत्तम महाजन – भाजप – २०,७१२
डी एम पाटील – मनसे – १२,८३३
प्रदीप पवार – काँग्रेस – ४,९०४


हे देखील वाचा – ४- रावेर लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -