घरमहा @२८८परतूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९९

परतूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९९

Subscribe

जालना जिल्ह्यातील परतूर (विधानसभा क्र. ९९) विधानसभा मतदारसंघ आहे.

जालना जिल्ह्यातील परतूर हा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. प्रत्येक निवडणुकीला नवीन आमदार निवडून देण्याचा परतूर विधानसभा मतदारसंघाचा लौकिक आहे. १९६२ पासून काँग्रेसचे या मतदारसंघावर वर्चस्व होते, मात्र १९९९ पासून भाजपने इथे स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. महाराष्ट्राचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मतदारसंघात बंजारा, दलित, मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र मतदार जाती-धर्माच्या मुद्द्यावर मतदान करतात की विकासाला साथ देतात, हे २०१९ च्या निकालानतंरच कळेल.

बबनराव लोणीकर यांनी मागच्या पाच वर्षात अनेक विकासकामे केली असल्याचा दावा केला आहे. मतदारसंघासाठी ४७००कोटींची कामे मंजूर झाली असून त्याची अंमलबजावणी सुरु असल्याचे लोणीकर सांगतात. तर मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – ९९

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष – १,४१,४८२
महिला – १,२६,०६७
एकूण मतदान – २,६७,५४९

विद्यमान आमदार – बबन लोणीकर, भाजप

परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातून बबनराव लोणीकर हे १९९९, २००४ आणि २०१४ असे तीन वेळा निवडून आलेले आहेत. यावेळी आमदारकीचा चौकार मारण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. कॅबिनेट मंत्री असल्यामुळे या मतदारसंघावर सर्व राज्याचे लक्ष असणार आहे. विकासकामांच्या जोरावर यावेळी देखील आपण निवडून येऊ, असा विश्वास लोणीकर यांना आहे.

लोणीकर हे मागच्या पाच वर्षात अनेकदा वादात अडकले होते. निवडणूक प्रतिज्ञापत्रात आतापर्यंत त्यांनी वेगवेगळी माहिती दिली असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला होता. २०१४ सालच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांचे शिक्षण पाचवी पास असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांच्या आधीच्या प्रतिज्ञापत्रात ते बीए पहिले वर्ष शिकले असल्याचे नमूद केलेले होते. तसेच लोणी गावातील ५० एकर जमीन लोणीकर यांनी एका साखर कारखान्याच्या नावावर केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. बबनराव लोणीकर यांच्यावर आरोपांची मालिका झाली असली तरी त्यांनी स्वच्छता विभागामार्फत प्रभावी काम केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली आहे.

partur mla baban lonikar
परतूरचे आमदार बबनराव लोणीकर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) बबन लोणीकर, भाजप – ४६,७६६
२) सुरेशकुमार जेथलिया, काँग्रेस – ४२,४६६
३) बाबासाहेब आकात, मनसे – ३७,३३५
४) निवास चव्हाण, अपक्ष – २४,३७१
५) सोमनाथ साखरे, शिवसेना – १८,९१२


हे वाचा – परभणी लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -