फुलंब्री विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १०६

औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री (विधानसभा क्र. १०६) विधानसभा मतदारसंघ आहे.

Aurangabad
pholambari assembly constituency
फुलंब्री विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १०६

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड हा विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा हा मतदारसंघ आहे. मागच्या पाच वर्षात अनेक विकासकामे केली असल्याचा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. २०१४ च्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. कल्याण काळे यांचा अवघ्या ३ हजार ६११ मतांनी पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत हरिभाऊ बागडे हे निवडणूक लढवणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. त्यामुळेच फुलंब्रीमध्ये आतापासूनच अनेकजण उमेदवारी मिळवण्यासाठी तयारी करत आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १०६

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,५४,४४३
महिला – १,३२,९१२
एकूण मतदान – २,८७,३५५

विद्यमान आमदार – हरिभाऊ बागडे, भाजप

तेराव्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद मिळवण्याचा मान मिळालेले हरिभाऊ बागडे हे अतिशय सामान्य घरातून आलेले राजकारणी आहेत. शाळेत असताना त्यांनी पेपर विक्री करण्याचे काम केले होते. आजवर आमदार, मंत्री आणि विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले तरिही त्यांची राहणी अतिशय साधी आहे. पांढरा सदरा, धोतर आणि डोक्यावर गांधी टोपी हा त्यांचा नेहमीचा पोषाख असतो.
हरिभाऊ बागडे यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी देखील झाले. २०१४ साली फुलंब्री मतदारसंघातून निवडून येण्याची त्यांची पाचवी वेळ होती. २०१९ मध्ये ते निवडणुकीला उभे राहणार की नाही? याबाबतची भूमिका त्यांनी अद्याप उघड केलेली नाही.

Phulambri MLA Haribhau Bagde
आमदार हरिभाऊ बागडे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) हरिभाऊ बागडे, भाजप – ७३,२९४
२) डॉ. कल्याण काळे, काँग्रेस – ६९,६८३
३) अनुराधा चव्हाण, राष्ट्रवादी – ३१,९५९
४) राजेंद्र ठोंबरे, शिवसेना – १७,५४६
५) रमेश दहिहंडे, अपक्ष — ६५०२


हे वाचा – जालना लोकसभा मतदारसंघ