घरमहा @२८८पिंपरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०६

पिंपरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २०६

Subscribe

२०६ क्रमांकाचा पिंपरी मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे.

२०६ क्रमांकाचा पिंपरी मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ४१८ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २०६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती


मतदारांची संख्या – 

पुरुष – ,०३,४३६
महिला – ,७९,२७८
एकूण मतदार – ,८२,७१८

- Advertisement -

विद्यमान आमदार – अॅड. गौतम सुखदेव चाबुकस्वार

अॅड. गौतम चाबुकस्वार हे शिवसेना पक्षाचे आमदार असून २०१४ साली ते ५१,०९६ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अण्णा बनसोडे यांना ४८,७६१ मत पडली असून त्यांचा पराभव झाला होता. उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी काँग्रेसकडील नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शिवसेनेची उमेदवारी स्वीकारलेल्या गौतम चाबुकस्वार यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली. बनसोडे यांच्या पक्षांतर्गत विरोधी फौजेने शिवसेनेला रसद पुरवल्याचे उघडपणे दिसून आले. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून आमदार बनसोडे, शिवसेनेचे चाबुकस्वार, भाजप-मित्र पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यात प्रमुख लढत होती. त्यात तिंरगी लढतीत चाबुकस्वारांनी अडीच हजाराच्या फरकाने बाजी मारली.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

अॅड. गौतम चाबुकस्वार; शिवसेना – ५१,०९६
अण्णा बनसोडे; राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ४८,७६१
चंद्रकांता सोनकांबळे; रिपब्लीकन ऑफ इंडिया – ४७,२८८
मनोज कांबळे; भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) – ११,०२२
अनिता सोनवणे; मनसे – ५,१६९


नोटा – ४४२६

मतदानाची टक्केवारी – ४६.२३


हेही वाचा – पिंपरी लोकसभा मतदारसंघ

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -