घरमहा @२८८राधानगरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २७२

राधानगरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७२

Subscribe

राधानगरी विधानसभा मतदार संघ हा कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील एक प्रमुख विधानसभा मतदार संघ आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील राधानगरी हा एक महत्त्वाचा विधानसभा मतदार संघ आहे. राधानगरी तालुक्याचा बहुतेक भाग हा डोंगरी आहे. आजही या भागात सोयीसुविधाचा अभावच आहे. येथील दवाखाने १५ ते २० मैलावर आहेत. कळ्ळमावाडी धरण, राधानगरी धरण, तुळशी धरण अशी ३ धरणं या तालुक्यात आहेत. छत्रपती शाहू महाराज यांच्या पदांनी पावन झालेला विभाग ‘राधानगरी तालुका’ हा महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

मतदारसंघ क्रमांक – २७२

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या 

पुरूष – १,५९,८९४
महिला – १,४६,५९५
एकूण – ३,०६,४९०

- Advertisement -

विद्यमान आमदार – प्रकाश आनंद आबिटकर

prakash aabitkar.jpg
विद्यमान आमदार – प्रकाश आनंद आबिटकर

प्रकाश आनंद आबिटकर हे राधानगरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ३० जून १९७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे प्रकाश आबिटकर यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना वाचन आणि समाजकार्याची आवड आहे. मागील निवडूकीत राष्ट्रवादीच्या के. पी. पाटील यांचा त्यांनी पराभव केला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) प्रकाश आनंद पाटील, शिवसेना – १,३२,४८५
२) के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – ९३,०७७
३) प्रा. जालिंदर पाटील, स्वा. शेतकरी संघटना – ५,९४२
४) सतप्पा कांबळे, बसपा – १,३९५
५) अशोक सुतार, बमुपा – ८९१


हेही वाचा – चंदगड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २७१

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -