राजुरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७०

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा (विधानसभा क्र. ७०) विधानसभा मतदारसंघ आहे.

Chandrapur
70 - Rajura Vidhansabh
राजुरा विधानसभा मतदारसंघ

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा हा क्रमांक ७० चा विधानसभा मतदारसंघ आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहर म्हणजे राज्याच्या टोकावरचा भाग आहे. या मतदारसंघात एकूण ३५५ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – ७०

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,५७,२६९

महिला – १,३९,४३०

एकूण मतदार – २,९६,६९९

विद्यमान आमदार – अॅड. संजय यादवराव धोटे, भाजप

राजुरा मतदारसंघात धोटे परिवाराचे वर्चस्व आहे. जिल्ह्यातील सर्वच पक्ष धोटेमय असल्याचे चित्र पाहायला मिळते. विधानसभा आणि पालिका अशा ठिकाणी धोटे कुटुंबातील सदस्य आलटून-पालटून सत्ता हस्तगत करतात. विद्यमान आमदार संजय धोटे भाजपकडून पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. धोटे यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भुषविले आहे. बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. तर अॅड. यादवराव धोटे मेमोरियल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

sanjay Dhote
आमदार अॅड. संजय धोटे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अॅड. संजय धोटे, भाजप – ६६,२२३

२) सुभाष धोटे, काँग्रेस – ६३,९४५

३) सुदर्शन निमकर, राष्ट्रवादी – २९,५२८

४) प्रभाकर दिवे, स्वतंत्र भारत पक्ष – १६,४३९

५) भारत आत्रम, बसपा – ८,०४९

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ