राळेगाव विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ७७

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव (विधानसभा क्र. ७७) विधानसभा मतदारसंघ आहे.

राळेगाव विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ७७

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येत असून अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. आदिवासीबहुल असलेल्या या मतदारसंघात स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा वरचष्मा राहिलेला आहे. मात्र २०१४ साली मोदीलाटेत इथे भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला.

मतदारसंघ क्रमांक – ७७

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४०,२१८
महिला – १,२९,४६८

एकूण मतदान – २,६९,६८८

विद्यमान आमदार – डॉ. अशोक उईके, भाजप

डॉ. अशोक उईके हे २०१४ साली प्रथमच राळेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. फडणवीस सरकारने तिसऱ्यांदा केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. आदिवासी विकास खात्याचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते आमदार अशा उईके यांचा प्रवास आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुरके यांचा पराभव करुन ते २०१४ साली जायंट किलर ठरले.
आमदार झाल्यानंतर त्यांनी राळेगाव, कळंब आणि बाभूळगाव या तीन तालुक्यातील नगरपंचायती भाजपकडे खेचून आणण्यात यश मिळवले आहे. तसेच भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.

MLA dr ashok uike
आमदार डॉ. अशोक उईके

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) डॉ. अशोक उईके, भाजप – १,००,६१८
२) प्रा. वसंतराव पुरके, काँग्रेस – ६१,८६८
३) सुरेश मेश्राम, बसपा – ५,७२७
४) उत्तम मडावी, शिवसेना – ५,३७६
५) मिलिंद धुर्वे, राष्ट्रवादी – १,८००

 


हे वाचा – यवतमाळ लोकसभा मतदारसंघ