घरमहा @२८८रामटेक विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५९

रामटेक विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५९

Subscribe

नागपूर जिल्ह्यात रामटेक (विधानसभा क्र.५९ ) विधानसभा मतदारसंघ आहे.

नागपूर जिल्ह्यात रामटेक शहर आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११च्या जनगननेनुासर रामटेकची लोकसंख्या १ लाख ५८ हजार ६४३ असे आहे. प्रभू श्रीरामांनी वनवासात असताना काही दिवस रामटेकमध्ये विश्राम केला होता, अशी पुराणकथेत म्हटले जाते. त्यामुळे या शहराचे नाव रामटेक पडले. १९९९ पासून शिवसेनेची रामटेकमध्ये सत्ता आहे. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने विभक्त लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत जिंकणारे शिवसेनेचे नेते आशिष जैसवाल यांचा पराभव झाला आणि भाजपचे द्वारम मल्लिकार्जुन रामी रेड्डी विजयी झाले.

मतदारसंघ क्रमांक – ५९
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या
पुरुष मतदार – १,३१,०९१
महिला मतदार – १,१६,४१३
एकूण मतदार -२,४७,५०४

विद्यमान आमदार – द्वारम मल्लिकार्जुन रामी रेड्डी, भाजप

mla mallikarjun reddy
विद्यमान आमदार द्वारम मल्लिकार्जुन रामी रेड्डी

द्वारम मल्लिकार्जुन रामी रेड्डी हे रामटेकमध्ये निवडून येणारे भाजपचे पहिले खासदार आहेत. रेड्डी २००७ ते २००९ भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी होते. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) द्वारम रेड्डी, भाजप – ५९,३४३
२) आशिष जयस्वाल, शिवसेना – ४७,२६२
३) सुबोध मोहिते, काँग्रेस – ९,१६२
४) डॉ. अमोल देशमुख, राष्ट्रवादी – ९,१६२
५) विशेष फुटाणे, बसप – ८,६०१


हेही वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -