घरमहा @२८८रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २६६

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २६६

Subscribe

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी (विधानसभा क्र. २६६) विधानसभा मतदारसंघ आहे.

रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे. या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे. हल्लीचा रत्‍नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्‍नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा म्हणत. दक्षिण रत्‍नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता. सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली.


मतदारसंघ क्रमांक – २६६

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १२,९९,९६
महिला – १३,९२,९३

- Advertisement -

एकूण मतदार – २,६५,२७९


 

विद्यमान आमदार – उदय सामंत ,शिवसेना

उदय सामंत हे शिवसेनेचे आमदार आहेत. २००४,२००९ आणि २०१४ ला महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. २०१३ ला महाराष्ट्राचे नगरविकास राज्यमंत्री होते. २०१३ला रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०१७ला पुण्याचे संपर्क प्रमुख म्हणून निवड. २०१८ ला शिवसेना पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती. २०१८ ला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त.


पहिले पाच उमेदवार

१. उदय सामंत,शिवसेना – ९३८७६
२. बाळासाहेब माने, भाजपा- ५४४४९
३. अमिन बाशीर,राष्ट्रवादी- १४१९५
४. रमेश किर- काँग्रेस- ५०५७

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -