घरमहा @२८८रिसोड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३३

रिसोड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३३

Subscribe

वाशिम जिल्ह्यातील रिसोड (विधानसभा क्र. ३३) विधानसभा मतदारसंघ आहे.

वाशिम जिल्ह्यातील रिसोड हा क्रमांक ३३ वा विधानसभा मतदारसंघ आहे. गेल्या १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष झनक यांचा पराभव झाल्याने या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अ‍ॅड. विजय जाधव विजयी झाले. त्यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मेडशी मतदारसंघावर प्रथमच भगवा फडकावला होता. २००४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसने सुभाष झनक यांना उमेदवारी दिली नव्हती. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मेडशीऐवजी रिसोड मतदारसंघ झाला. सुभाष झनक यांनी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून एक वर्ष कार्य केले. त्यांच्या रूपाने जिल्ह्य़ाला प्रथमच लालदिवा मिळाला होता.

मतदारसंघ क्रमांक – ३३

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,५३,४८६

महिला – १,३७,३९१

एकूण मतदार – २,९०,८७७

विद्यमान आमदार – अमित झनक, काँग्रेस

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वाशीम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झनक घराण्याचे वर्चस्व राहिलेले आहे. रामराव झनक यांनी वाशीम मतदारसंघातून एक वेळा आणि मेडशी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण करून विधानसभेत चार वेळा प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर हा वारसा त्यांचे पुत्र सुभाष झनक यांनी घेऊन मेडशी मतदारसंघातून आमदारकीची हॅटट्रीक पूर्ण केली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये सुभाष झनक यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने रिसोड मतदारसंघाचा राजकीय वारसा चालवण्याची संधी सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक यांना मिळाली. रिसोड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीस अमित झनक १२ हजाराचे मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. तर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमित झनक यांनी भाजपच्या विजय जाधव यांचा पराभव करत आमदारही मिळवली.

Amit Zanak
आमदार अमित झनक

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अमित झनक, काँग्रेस – ७०,९३९

२) विजय जाधव, भाजप – ५४,१३१

३) विश्वनाथ सानप, शिवसेना – १८,४२५

४) रामकृष्ण कलपाड, भारिप – १५,३४८

५) राजू पाटील राजे, मनसे – १२,३९६

हे वाचा – ६ – अकोला लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -