घरमहा @२८८साक्री विधानसभा मतदारसंघ - म.क्र. ५

साक्री विधानसभा मतदारसंघ – म.क्र. ५

Subscribe

धुळे जिल्ह्यातील साक्री (विधानसभा क्र.५) विधानसभा मतदारसंघ आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. साक्री विधानसभा मतदारसंघाचा समावेश धुळे जिल्हयात असला तरीही हा मतदार संघ लोकसभेसाठी नंदुरबार लोकसभेला जोडण्यात आला आहे. आतापर्यंत काँग्रेसचा गड असणारा हा विधानसभा मतदार संघ एक वेळेस भारीप व दोन वेळेस भाजपाकडे राहीला आहे. या मतदार संघात पिंपळनेर परीसरात पावरा व कोकणी समाजाचे मोठे मतदार आहे. तर कासारे,मालपुर,धाडणे,म्हसदी,साक्री शहर या गावांमधे संमिश्र लोकसंख्या आहे. पुरोगामी विचारांचा तालुका म्हणुन ओळख असलेल्या साक्री विधानसभा मतदार संघात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.

मतदारसंघ क्रमांक –

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण – अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,७६,३१०
महीला – १,६६,००४
तृतियपंथी १०
एकुण मतदार संख्या ३,४२,३२४

- Advertisement -

विदयमान आमदार डि एस अहीरे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

राज्याच्या प्रशासन सेवेत नोकरीस असणारे डॉ डी एस अहीरे यांनी सर्व प्रथम धुळे लोकसभेसाठी काँग्रेसच्यावतीने उमेदवारी करीत विजय मिळवला. त्यानंतर हा विधानसभा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसने पुन्हा त्यांना 2004 मधे विधानसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत काँग्रेसच्या हातातुन गेलेला हा मतदार संघ पुन्हा काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतला. यानंतर पुन्हा 2014 मधे पक्षाने अहीरे यांना संधी दिल्याने ते विजयी झाले.

साक्री विधानसभा मतदारसंघ आमदार डी एस अहिरे

2014 विधानसभा निवडणुकीची परीस्थिती

डि एस अहीरे – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ७४,७६०
सौ मंजूळाताई गावीत – भारतीय जनता पार्टी – ७१,४३७
चुडामण पवार – शिवसेना – १२,८३२
दिलीप नाईक – राष्ट्रवादी – १२,३९८


हे देखील वाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -