घरमहा @२८८शिराळा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २८४

शिराळा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८४

Subscribe

सांगली जिल्ह्यातील शिराळा (विधानसभा क्र. २८४) विधानसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिराळा मतदारसंघाविषयी भाजपमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मागील निवडणूकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्याने भाजपचे शिवाजीराव नाईक यांनी या मतदारसंघात बाजी मारली. मागील निवडणूकीत या मतदारसंघात नाईक विरुद्ध नाईक विरुद्ध देशमुख अशी तिरंगी लढत रंगली होती. नाईक अधिक देशमुख हेच या मतदारसंघाचे समीकरण आहे. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांना पक्षात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २८४
मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

पुरुष – १,४२,७७७
महिला – १,३२,११२
एकूण – २,७४,८८९

- Advertisement -

विद्यमान आमदार – शिवाजीराव यशवंतराव नाईक

shivajirao-naik
विद्यमान आमदार – शिवाजीराव यशवंतराव नाईक

शिराळा मतदारसंघाचे शिवाजीराव यशवंतराव नाईक हे विद्यमान आमदार आहेत. २ मार्च १९४५ रोजी सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील तडवळे येथे त्यांचा जन्म झाला. ते उच्चशिक्षित आहेत. त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मानसिंगराव पाटील यांचा दारूण पराभव केला होता.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) शिवाजीराव यशवंतराव नाईक, भाजप – ८५,३६३
२) मानसिंगराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस – ८१,६९५
३) सत्यजित देशमुख, काँग्रेस – ४५,१३५
४) नंदकिशोर निळकंठ, शिवसेना – २,०६१
५) मोहन आटवडेकर, अपक्ष – १,२४९


हेही वाचा – इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २८३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -