घरमहा @२८८शिरपुर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ९

शिरपुर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ९

Subscribe

धुळे जिल्ह्यातील शिरपुर (विधानसभा क्र.९) विधानसभा मतदारसंघ आहे.

धुळे जिल्ह्यातील शिरपुर हा विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. धुळे जिल्हयातील शिरपुर मतदारसंघ हा मुंबई आग्रा महामार्गालगत असुन मध्यप्रदेशचा सिमावर्ती भाग या तालुक्याला जोडला आहे. हा विधासभा मतदारसंघ धुळे जिल्हयात समाविष्ट असला तरीही लोकसभेच्या निवडणुकीसाठी हा मतदार संघ नंदुरबार लोकसभेला जोडण्यात आला आहे. २००९ च्यापुर्वी हा मतदार संघ खुला होता. त्यामुळे येथुन आमदार अमरीशभाई पटेल हे सलग तीन वेळेस निवडुन गेले. पण, त्यानंतर हा मतदार संघ अनुसूचीत जमातीसाठी राखिव झाला. या मतदारसंघात आदीवासी समाजाचे मतदार निर्णायक असुन शिरपुर व अन्य मोठया गावांमधे संमिश्र लोकसंख्या आहे. पण, पावरा व कोकणी लोकसंख्या मोठी असल्याने या मतदार संघात आरक्षणात बदल करण्यात आला. शिरपुर तालुक्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे असुन या संस्थांमधे राज्याबाहेरील विदयार्थी देखिल प्रवेश घेत असतात.

मतदार संघ क्रमांक –

- Advertisement -

मतदार संघ आरक्षण – अनुसूचीत जमाती

मतदारांची संख्या
पुरुष- १,६३,०९२
महीला–१,५६,६३५
तृतीयपंथी – 0
एकुण मतदार –  ३,१९,७२७

- Advertisement -

विदयमान आमदार कांशीराम पावरा – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

शिरपुर विधानसभेचे आमदार कांशीराम पावरा हे आमदार तथा माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचे खंदे समर्थक म्हणुन ओळखले जातात. या मतदार संघावर आ पटेल यांची पकड असल्याने सर्व प्रथम आमदार पावरा यांना २००९ मधे उमेदवारी करण्याची संधी मिळाली. यात त्यांना विजय मिळाला. देश व राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट असतांना या मतदारसंघातील मतदारांनी २०१४ मधे पुन्हा आमदार कांशीराम पावरा यांना विधानसभेत पाठवले.

शिरपूर विधानसभा मतदारसंघ आमदार काशीराम पावरा

२०१४ विधानसभा निवडणुकीची परिस्थिती

कांशीराम पावरा- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ९८,११४
डॉ जितेंद्र ठाकुर भारतीय जनता पार्टी –७२,९१३
जयंत पाडवी राष्ट्रवादी – ११,४०९
रणजीतसिंह पाडवी शिवसेना ३,९४२


हे देखील वाचा नंदुरबार लोकसभा मतदारसंघ


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -