घरमहा @२८८शिरूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९८

शिरूर विधानसभा मतदारसंघ- म. क्र. १९८

Subscribe

पुणे जिल्ह्यातील शिरूर हा (विधानसभा क्र. १९८) विधानसभा मतदारसंघ आहे.

१९८ क्रमांकाचा शिरूर मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील शिरूर या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण ३२० मतदान केंद्र आहेत. शिरुर विधानसभा मतदारसंघ हा मतदारसंघ खेड आळंदी प्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र याही मतदारसंघात भाजपाचे आमदार बाबुराव पाचार्णे यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांचा पराभव करत संपूर्ण तालुक्याचे वातावरण भाजपयुक्त झाले आहे.

विकासकामांच्या जोरावर आमदार पाचार्णे यांनी या मतदारसंघावर पकड निर्माण केली आहे. मात्र शिरुर तालुक्यात अनेक समस्या आजही जशास तसा असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करत अनेक आंदोलने उभी राहिली आहेत. काहीच दिवसांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना या मतदार संघातून चांगलं मताधिक्य देण्यात आल्याने, या मतदारसंघात युतीची ताकद कमी झाल्याचं चित्र दिसत आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १९८

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – १,६३,८४३

महिला – १,४६,६४६

एकूण मतदार – ३,१०,४८९


विद्यमान आमदार – बाबुराव काशीनाथ पाचर्णे

बाबुराव काशीनाथ पाचर्णे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ९२,५७९ मतं मिळवून विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अशोक पवार हे उभे होते. या निवडणुकीत त्यांना ८१,८३८ मत पडली होती.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत शिरुर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बाबुराव काशीनाथ पाचर्णे यांनी ९२,५७९ एवढी मते घेत विजय मिळवला. शिरुर विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार होते. त्यांना ८१,८३८ मते मिळाली आणि त्यांचा १०,९४१ मतांनी पराभव झाला. शिरुर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर शिवसेनाचे संजय सातव-पाटील, चौथ्या स्थानावर मनसेचे संदीप भोंडवे आणि पाचव्या क्रमांकावर काँग्रेसचे कमलाकर सातव हे होते.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • बाबुराव काशीनाथ पाचर्णे, भारतीय जनता पक्ष- ९२,५७९
  • अशोक पवार, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष – ८१,८३८
  • संजय सातव-पाटील, शिवसेना – १७,१८७
  • संदीप भोंडवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १३, ६२१
  • कमलाकर सातव, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ४,२४६

नोटा – १,३४५

मतदानाची टक्केवारी – ६९.६४%


हेही वाचा – शिरुर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -