घरमहा @२८८तिवसा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ३९

तिवसा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ३९

Subscribe

अमरावती जिल्ह्यात तिवसा मतदारसंघ (मतदार क्रमांक - ३८) आहे.

अमरावती जिल्ह्यात तिवसा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचा क्रमांक ३९ आहे. २०११ च्या जनगननेनुसार तिवसा मतदारसंघाची एकूण १,०४,७२८ इतकी आहे. हा मतदारसंघ अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. या मतदारसंघाचे अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे) या विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर या २०१४ साली दुसऱ्यांदा या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. चंद्रकांत ठाकुर हे या मतदरासंघाचे पहिले आमदार निवडून आले होते. त्यावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. या मतदारसंघात आतापर्यंत चार वेळा काँग्रेसची सत्ता राहिलेली आहे. तर भाजपचे उमेदवार दोन वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत ठाकुर, शरद तासरे, साहेबराव थत्ते आणि यशोमती ठाकूर यांचा या मतदारसंघात दोन वेळा विजय झाला आहे.

मतदारसंघ क्रमांक – ३९
मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -
मतदारांची संख्या

पुरुष – ९४,२५६
महिला – ७५,३९४
एकूण मतदार – १,७०,३९४

विद्यमान आमदार – अॅड. यशोमती ठाकूर, काँग्रेस

अॅड. यशोमती ठाकूर हे तिवसा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा याच मतदारसंघातून विजय झाला होता. ते उच्च शिक्षित आहेत. त्यांचे बी. ए., एल.एल.बी. शिक्षण झाले आहे. १९८९ साली त्यांनी ड्युक ऑफ एडनबर्गचे ब्राँझ पदक प्राप्त केले. त्याचबरोबर १९९३ साली ऑल इंडिया एन.सी.सी. च्या बेसिक लीडरशीप कॅम्पमध्ये त्यांनी नेमबाजीचे सुवर्ण पदक प्राप्त केले. यशोमती ठाकूर या २००४ ते २००८ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस राहिल्या आहेत. २००७ पासून त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कायदेशीर सल्लागार समितीच्या सचिव झाल्या. त्यानंतर २००८ पासून अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. २०१० ते २०१४ यशोमती ठाकूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी राहिल्या. २००४ पासून त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आहेत.

- Advertisement -
Adv. yashomati thakur
तिवसा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अॅड. यशोमती ठाकूर

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) अॅड. यशोमती ठाकूर (सोनवणे), काँग्रेस – ५८,८०८
२) श्रीमती निवेदिता चौधरी, भाजप – ३८,३६७
३) दिनेश वानखेडे, शिवसेना – २८,६७१
४) संजय लव्हाळे, बहुजन समाज पक्ष – ११,३५४
५) श्रीमंती संयोगिता निंबाळकर, अपक्ष – ९,९४५

हेही वाचा – ७ – अमरावती लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -