घरमहा @२८८तिरोरा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६४

तिरोरा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६४

Subscribe

गोंदिया जिल्ह्यात तिरोरा विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६४) आहे.

गोंदिया जिल्ह्यात तिरोरा विधानसभा मतदारसंघ आहे. हा विधानसभा मतदारसंघ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. तिरोरा शहर तांदूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या शहरातील बहुतांश नागरिक तांदूळाच्या गिरणीत काम करतात तर काही नागरिक धान्य व्यापारी आहेत. २०११च्या जनगननेनुसार तिरोराची लोकसंख्या ही १ लाख ७६ हजार २५४ इतकी आहे.

मतदारसंघ क्रमांक – ६४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,२०,०६८
महिला – १,१९,८७१
एकूण मतदार – २,३९,९३९

- Advertisement -

विद्यमान आमदार – विजय भरतलाल रहांगडाले, भाजप

mla vijay rahangdale
विद्यमान आमदार विजय रहांगडाले

विजय भरतलाल रहांगडाले हे तिरोरा शहराचे विद्यमान आमदार आहेत. ते उच्च शिक्षित आहेत. ते २००१-०४ भाजपचे गोंदियाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष होते. त्यानंतर २००५ ते २००९ युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. २००३ ते २००५ तिरोडा पंचायत समितीचे सभापती होते. २००६ ते २०१३ कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती होते. २०१० ते २०१३ अर्थ व बांधकाम समितीचे सभापती होते. २०१४ साली त्यांनी तिरोरा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा विजय झाला.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) विजय रहांगडाले, भाजप – ५४,१६०
२) दिलीप बनसोड, ४१,०६२
३) श्रीमती राजलक्ष्मी तुरकर, राष्ट्रवादी -३१,१४७
४) पी. जी. कटरे, काँग्रेस -१८,१७६
५) पंचम बिसेन, शिवसेना – ११,९७८


हेही वाचा – ११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -