घरमहा @२८८तुळजापूर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २४१

तुळजापूर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४१

Subscribe

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर (विधानसभा क्र. २४१) विधानसभा मतदारसंघ आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर हा क्रमांक २४१ वा विधानसभा मतदारसंघ आहे.तुळजापूरचा उल्लेख केल्याशिवाय उस्मानाबादची ओळख पूर्ण होत नाही. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिचा आशीर्वाद घेऊनच अनेक पक्ष आपल्या प्रचाराला सुरुवात करतात. तुळजापूरचे वैशिष्ट्य म्हणजे, आई तुळजाभवानीच्या सर्व पूजा धोतर परिधान करूनच केल्या जातात. तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी आजतागायत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे चित्र पाहता १९६२ मध्ये काँग्रेसचे कै. साहेबराव हंगरगेकर यांनी विजय मिळविला होता. त्यांचा पेहराव नेहमीच टोपी, शर्ट आणि धोतर असाच होता. १९६७ साली कै. शिवाजीराव पाटील या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर १९७२ च्या निवडणुकीत शिवाजीराव पाटील हे पुन्हा विजयी झाले. १९७८ मध्ये कै. माणिकराव खपले निवडून आले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तुळजापूर शेकापमय करून सोडला. त्यानंतर १९८० सि. ना. आलुरे गुरुजी काँग्रेसतर्फे विजयी झाले. १९९० तसेच १९९९ व २००४ आणि त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मधुकरराव चव्हाण आमदार म्हणून निवडून आले.

मतदारसंघ क्रमांक – २४१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,७८,५१५

महिला – १,५१,६३४

एकूण मतदार – ३,३०,१५६

विद्यमान आमदार – मधुकरराव चव्हाण, काँग्रेस

तुळजापूर मतदारसंघावर सुरुवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत. मधुकरराव चव्हाण या मतदार संघातून ५ वेळेस आमदार असून २०१९ च्या निवडणुकीत विजयाचा षटकार मारणार का हे पाहावे लागेल. धोतर कुर्ता असा पेहराव असलेले जे विधिमंडळातील बुजुर्ग आमदार २०१४ च्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना ७० हजार ७०१ मते पडली तर राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांना ४१ हजार ०९१ मते पडली त्यामुळे चव्हाण २९ हजार ६१० मतांनी निवडून आले.यंदा आघाडी ठरल्याने त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर आहे.

madhukarrao chavan
आमदार मधुकरराव चव्हाण

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) मधुकरराव चव्हाण, काँग्रेस – ७०,७०१

२) जीवनराव गोरे, राष्ट्रवादी – ४१,०९१

३) संजय निंबाळकर, भाजप – ३६,३८०

४) देवाचंद रोचकरी, मनसे – ३५,८९५

५) सुधीर पाटील, शिवसेना – २४,९९१

हेवाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -