घरमहा @२८८तुमसर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ६०

तुमसर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ६०

Subscribe

भंडारा जिल्ह्यात तुमसर विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ६०) आहे.

तुमसर विधानसभा मतदारसंघ भंडारा जिल्ह्यात आहे. तुमसर विधानसभा मतदारसंघ हा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. २०११च्या जनगननेनुसार तुमसरची लोकसंख्या ही २ लाख २६ हजार १०८ इतकी आहे. तुमसर शहर हे तांदुळच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. १९८० पर्यंत या मतदारसंघात काँग्रेसची सलग सत्ता राहिली. १९९५ ते २००९ पर्यंत भाजपती सत्ता राहिली. २००९ साली काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली. मात्र, २०१४च्या विधानसभा निवडणूक भाजपचा उमेदवार पुन्हा तुमसर मतदारसंघातून निवडून आला.

मतदारसंघ क्रमांक – ६०

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला

मतदारांची संख्या
पुरुष – १,४३,७५२
महिला – १,३८,५६७
एकूण मतदार – २,८२,३१९

- Advertisement -

विद्यमान आमदार – चरण सोविंदा वाघमारे, भाजप

mla charan waghmare
विद्यमान आमदार चरण वाघमारे

चरण वाघमारे तुमसर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ साली त्यांनी पहिल्यांदा तुमसर येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. चरण वाघमारे विद्यार्थी दशेपासूनच सामाज कार्यात सक्रिय आहेत. १९९३-९६ ते विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख होते. १९९६ ते २००० वाघमारे शिवसेनेचे मोहाडी तालुका प्रमुख होते. २०१३ साली भाजपचे भंडारा जिल्ह्याचे महामंत्री होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमसर मतदारसंघासाठी त्यांना उमेदवारी मिळाली.

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) चरण वाघमारे, भाजप – ७३,९५२
२) मधुकर कुकडे, राष्ट्रवादी – ४५,२७३
३) राजेंद्र पटले, शिवसेना – ३६,००५
४) प्रमोद तितीरमारे, काँग्रेस – १७,५६९
५) नामदेव ठाकरे, बसप – १७,३७५


हेही वाचा – ११ – भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -