घरमहा @२८८उदगीर विधानसभा मतदारसंघ - म. क्र. २३७

उदगीर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २३७

Subscribe

लातूर जिल्ह्यातील उदगीर (विधानसभा क्र. २३७) विधानसभा मतदारसंघ आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर हा क्रमांक २३७ वा विधानसभा मतदारसंघ आहे. उदगीर या मुस्लीम बहुल मतदारसंघावर आर्य समाज, हिंदुत्ववादी विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्याचबरोबर येथील विजय हा जातीय समीकरणावर आधारित असतो. याचा कायमच प्रत्यय येत राहतो. या मतदारसंघात उमेदवार कोण यापेक्षा जातीय समीकरणे प्रबळ आहेत. उदगीर हा राखीव मतदारसंघ आहे. जेव्हापासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे. तेव्हापासून भाजपाने ही जागा स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे. भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मागील दोन्ही वेळी येथून विजय मिळवला आहे.

मतदारसंघ क्रमांक – २३७

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचीत जाती

मतदारांची संख्या

- Advertisement -

पुरुष – १,४५,११९

महिला – १,२५,७६१

एकूण मतदार – २,७०,८८०

विद्यमान आमदार – सुधाकर भालेराव, भाजप

मागील दोन टर्म भाजपाचे सुधाकर भालेराव येथून निवडून येत आहेत. २०१४ मध्ये भाजप अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी असली तरी मोदी लाटेचा प्रभाव, राष्ट्रवादीची फाटाफूट, काँग्रेसमधील विस्कळीतपणाचा फायदा भालेराव यांना मिळाला. मात्र यावेळी तो फायदा मिळण्याची शक्यचा कमी असल्याचे सांगितले जात आहे. भाजपातील अनेक गट आमदाराच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. राज्यात राष्ट्रवादीच्या झालेल्या वाताहतीचा काहीसा परिणाम या मतदारसंघावरही होत आहे. खंबीर नेतृत्वाअभावी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात लढण्याची उमेदच राहिली नाही.

sudhakar bhalerao
आमदार सुधाकर भालेराव

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुधाकर भालेराव, भाजप – ६६,६८६

२) संजय बनसोडे, राष्ट्रवादी – ४१,७९२

३) रामकिशन सोनकांबळे, काँग्रेस – ३७,८३७

४) रामचंद्र आदावळे, शिवसेना – १५,४१८

५) एम. आर. गायकवाड, अपक्ष – १,९५८

हेवाचा – ४१ – लातूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -