घरमहा @२८८उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४१

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १४१

Subscribe

१४१ क्रमांकाचा उल्हासनगर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे.

एकेकाळी सिंधी बहुल असलेला हा मतदार संघ आता संमिश्र मतदारसंघ झालेला आहे. या मतदारसंघातून पप्पू कलानी हे तीन वेळा तर त्यांची पत्नी ज्योती कलानी या दोन वेळा निवडून आलेल्या आहेत. २०१४ मध्ये ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजपची युती न झाल्याने भाजप उमेदवार कुमार आयलानी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. अवघ्या १८०० मतांच्या फरकाने ज्योती कलानी यांचा विजय झाला होता.

या मतदारसंघात आता ज्योती कलानी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढण्यास इच्छूक नसून भाजपच्या तिकिटावर त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. दुसरा पर्याय म्हणजे त्यांना तिकीट न मिळाल्यास त्यांचा मुलगा ओमी कलानी किंवा सून पंचम कलानी (विद्यमान महापौर) यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी कलानी कुटुंबियांनी केली आहे. १४१ क्रमांकाचा उल्हासनगर मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण या विधानसभा मतदार संघात आहे. या मतदारसंघात एकूण २९० मतदान केंद्र आहेत.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १४१

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – ,८१,३०७
महिला – ,४५,३५३
एकूण मतदार – ,२६,६८४


विद्यमान आमदार – ज्योती कलानी

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्योती कलानी यांनी ४३, ७६० हजार मतांनी विजय मिळवला होता. ज्योती कलानी या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदार असून त्यांच्याविरोधात उभे असणारे भारतीय जनता पक्षाचे कुमार आयलानी यांना ४१ हजार ८९७ मत पडली होती.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • ज्योती कलानी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष – ४३, ७६९
  • कुमार आयलानी, भाजप – ४१, ८९७
  • धनंजय बोडारे, शिवसेना – २३, ८६८
  • मोहन कंधारे, अपक्ष – २, ९७६
  • प्रकाश कुकरेजा, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – २, ९३३


    नोटा – १३०८

मतदानाची टक्केवारी – ३८.२५


हेही वाचा – कल्याण लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -