उमरगा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. २४०

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा (विधानसभा क्र. २४०) विधानसभा मतदारसंघ आहे.

Osmanabad
240 - Omerga assembly constituency
उमरगा विधानसभा मतदारसंघ

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा हा क्रमांक २४० वा विधानसभा मतदारसंघ आहे. उमरगा विधानसभा मतदार संघ हा १९९५ नंतर शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. माजी खासदार रवींद्र गायकवाड व त्यांचे शिष्य विद्यमान आमदार ज्ञानराज चौघुले हे दोघेही २ वेळेस आमदार राहिले आहेत. रवींद्र गायकवाड खासदार झाल्यानंतर चौघुले आमदार झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गायकवाड यांचे खासदारकीचे तिकीट कापल्यानांतर त्यांनी उघडपणे केलेले बंड व त्यावेळी विद्यमान आमदार चौघुले यांनी साधलेले सूचक मौन २०१९ च्या विधानसभा तिकीट वाटपवेळी पथ्यावर पडू शकते. सध्या चौघुले हे गायकवाड बोले तैसे चाले असे असले तरी त्यांनी कार्यकर्ते यांचा गट सक्रीय केला आहे. माजी खासदार गायकवाड यांनी उघड विरोध करूनही शिवसेनेला २०१९ च्या लोकसभेत तब्बल १९ हजारांची विक्रमी आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. गायकवाड आता त्यांचे पुत्र किरण यांच्या भवितव्यासाठी धडपडत आहेत.

मतदारसंघ क्रमांक – २४०

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या

पुरुष – १,५०,९२५

महिला – १,३०,७५८

एकूण मतदार – २,८१,६८३

विद्यमान आमदार – ज्ञानराज चौगुले, शिवसेना

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे ज्ञानराज चौघुले यांना ६५ हजार १७८ नंतर तर प्रतिस्पर्धी काँग्रेसचे किसन कांबळे यांना ४४ हजार ७३६ मते पडली व चौघुले २० हजार ४४२ मतांनी विजयी झाले . गुरु शिष्य जोडीच्या लोकसभेतील भूमिकेमुळे शिवसेना पक्षश्रेष्टी उमेदवारीची भाकरी पलटवणार का? यांची मतदार संघात जोरदार चर्चा आहे. मात्र चौघुले यांचे समाधानकारक काम, मातोश्रीच्या दरबारी असलेली निष्ठा व स्वच्छ प्रतिमा त्यांना तारू शकते. भाजपकडून कैलास शिंदे,काँग्रेसकडून दिलीप भालेराव, किसान कांबळे,सेनेकडून विलास व्हटकर इच्छुक आहेत.

Dnyanraj chougule
आमदार ज्ञानराज चौगुले

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) ज्ञानराज चौगुले, शिवसेना – ६५,१७८

२) किसन कांबळे, काँग्रेस – ४४,७३६

३) कैलास शिंदे, भाजप – ३०,५२१

४) संजय गायकवाड, राष्ट्रवादी – १५,५६९

५) दत्ता गायकवाड, बसपा – १,६७५

हेवाचा – ४० – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ