उमरखेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ८२

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड (विधानसभा क्र. ८२) विधानसभा मतदारसंघ आहे.

umarkhed assembly constituency
पुसद विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ८२

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. विदर्भ आणि मराठवाड्याच्या वेशीवर उमरखेड मतदारसंघ आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. उमरखेड शहर हे यवतमाळ जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून व्यापारी केंद्र देखील आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा या नदीवर असलेला सहस्त्रकुंट धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.

मतदारसंघ क्रमांक – ८२

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचित जाती

मतदारांची संख्या
पुरुष – १,४६,१७९
महिला – १,३१,००७
एकूण मतदार – २,७७,१८७

विद्यमान आमदार – राजेंद्र नजरधने, भाजप

राजेंद्र नजरधने हे भाजप पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आमदर म्हणून निवडून आले आहेत. अत्यंत बिकट परिस्थितीतून येत त्यांनी राजकारणात आपले स्थान निर्माण केले. बी.ए. बी.एड.चे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ऑटो चालविण्याचे काम केले होते. त्यानंतर एलआयसी एजंट म्हणून काम करत असताना त्यांनी जनसंपर्क वाढविला. या जनसंपर्काच्या आधारे त्यांनी महागाव पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडणूक जिंकली. २००९ सालीही त्यांनी उमरखेडमधून निवडणूक लढवली होती, मात्र तेव्हा त्यांना यश मिळाले नाही. मात्र २०१४ साली भाजपकडून निवडणूक लढवत असताना त्यांना भरघोस मते मिळाली.

mla rajendra najardhane
आमदार राजेंद्र नजरधने

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) राजेंद्र नजरधने, भाजप – ९०,१९०
२) विजय खडसे, काँग्रेस – ४१,६१४
३) शिवशंकर पांढरे, शिवसेना – २४,५७०
४) मोहनराव मोरे, राष्ट्रवादी – १९,००७
५) गजानन कांबळे, बीएमयुपी – १४५८

 


हे वाचा – हिंगोली लोकसभा मतदारसंघ