घरमहा @२८८उमरेड विधानसभा मतदारसंघ - म. क्र. ५१

उमरेड विधानसभा मतदारसंघ – म. क्र. ५१

Subscribe

उमरेड विधानसभा मतदारसंघ (विधानसभा क्र. ५१) नागपूर जिल्ह्यात येतो. हा विधानसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा एक अविभाज्य घटक आहे.

नागपूर जिल्ह्यात उमरेड विधानसभा मतदारसंघ आहे. २०११च्या जनगननेनुसार उमरेडची लोकसंख्या १ लाख ५४ हजार १८० इतकी आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. त्याचबरोबर उमरेड मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. २००९ पासून या मतदारसंघात भाजपची सत्ता आहे.

मतदारसंघ क्रमांक – ५१

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – अनुसूचुत जाती

मतदारांची संख्या

पुरुष – १,४८,३२५
महिला – १,३५,६२६
एकूण मतदार – २,८४,०२०

- Advertisement -

विद्यमान आमदार – सुधीर लक्ष्मणराव पारवे, भाजप

सुधीर लक्ष्मणराव पारवे हे उमरेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९७ ते २००२ भिवापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती होते. २००२ ते २००७ आणि २००७ ते २००९ ते नागपूर जिल्हा परिषद सदस्य होते. २००९ साली उमरेड येथून त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. त्यानंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा मोठा मतधिक्क्यांनी विजय झाला.

MLA SUDHIR PARVE
विद्यमान आमदार सुधीर पारवे

विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) सुधीर लक्ष्मणराव पारवे, भाजप – ९२,३९९
२) रुक्षदास बनसोड, बसप – ३४,०७७
३) राजू पारवे, अपक्ष – २३,४९७
४) संजय मेश्राम, काँग्रेस – १७,५८६
५) जगन्नाथ अभ्यंकर, शिवसेना – ७,१८०


हेही  वाचा – १० – नागपूर लोकसभा मतदारसंघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -