घरमहा @२८८वर्सोवा विधानसभा मतदारसंघ - म. क्र. १६४

वर्सोवा विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १६४

Subscribe

वर्सोवा (विधानसभा क्र. १६४) हा मुंबई उपनगरातला विधानसभा मतदारसंघ आहे.

मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गीय मतदारांचं प्राबल्य या मतदारसंघात आहे. त्यामुळे नागरी समस्यांकडे या मतदारसंघाचा ओढा अधिक असतो. मुस्लीम मतदारांचंही दखलपात्र प्रमाण असल्यामुळेच एमआयएमचे अब्लुल शेख यांनादेखील २०१४च्या निवडणुकांमध्ये चांगली मतं मिळाली होती. मात्र २००९मध्ये काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ २०१४च्या मोदी लाटेमध्ये अलगद भाजपच्या पारड्यात येऊन पडला. या मतदारसंघात एकूण २९१ मतदान केंद्र आहेत.

मतदारसंघ क्रमांक – १६४

- Advertisement -

मतदारसंघ आरक्षण – खुला


मतदारांची संख्या

पुरुष – १,६७,०४४
महिला – १,३४,४३९

- Advertisement -

एकूण मतदार – ३,०१,४८३


Bharati Lavekar
भारती लव्हेकर, भाजप आमदार

विद्यमान आमदार – भारती लव्हेकर, भाजप

२००९मध्ये १२ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेल्या बलदेव खोसांना भारती लव्हेकर यांनी तब्बल २५ हजारांच्या मताधिक्याने हरवत आमदारकी आपल्या नावावर केली. २०१३पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या भारती लव्हेकर भाजपवासी झाल्या आणि २०१४मध्ये आमदार झाल्या. मात्र, त्याआधी स्त्रियांच्या प्रश्नांवर त्यांनी उल्लेखनीय काम केल्यामुळे त्यांची प्रतिमा सुधारणावादी झाली होती. तसेच, उच्च विद्याविभूषित असलेल्या भारती लव्हेकर यांनी या मतदारसंघातल्या उच्चशिक्षित मतदारांना आपल्याकडे सहज आकर्षित केलं. त्याच आधारावर त्या पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून गेल्या.


विधानसभा निवडणूक २०१४ निकाल

१) भारती लव्हेकर, भाजप – ४९,१८२
२) बलदेव खोसा, राष्ट्रवादी – २२,७८४
३) अब्दुल शेख, एमआयएम – २०,१२७
४) मनीष धुरी, मनसे – १४,५०८
५) नरेंद्र वर्मा, राष्ट्रवादी – ३७१०

नोटा – ३२६६

मतदानाची टक्केवारी – ३८.९० %


हेही वाचा – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -