घरमहा @२८८वसई विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३३

वसई विधानसभा मतदारसंघ – म. क्र. १३३

Subscribe

पालघर जिल्ह्यातील वसई (विधानसभा क्र. १३३) विधानसभा मतदारसंघ आहे.

पालघर जिल्ह्यातील वसई हा क्रमांक १३ चा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात एकूण ३२९ मतदान केंद्र आहेत. वसईत राजकीय ध्रुवीकरण सुरू झाले असून पक्षाला पालघर जिल्ह्यात सक्षम बनवण्यासाठी वसई विधानसभेची जागा पक्षाने लढवावी असा आग्रह वसईतील काँग्रेसजनांनी श्रेष्ठींकडे केली आहे. त्यासाठी तब्बल आठ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. इतकेच नाही तर पुढच्या वर्षी होणार्‍या महापालिका निवडणुकीत काँग्रेसला भागीदारी मिळायला हवी, असाही आग्रह धरण्यात आला आहे. तर हितेंद्र ठाकूरांची त्यामुळे डोकेदुखी मात्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेससोबत असल्याने वसई विधानसभा मतदारसंघात बविआला आघाडी मिळाली. काँग्रेसचा उमेदवार असता तर बविआ पिछाडीवर गेला असता. विधानसभेसाठी काँग्रेसने उमेदवार उभा केला तर बविआच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो. म्हणूनच यावेळी तरी वसईची जागा काँग्रेसने लढवावी असा काँग्रेसजनांचा आग्रह आहे. तसेच पुढच्यावर्षी होणार्‍या वसई विरार महापालिका निवडणुकीत बविआकडून भागीदारी घ्यावी. तरच पालघर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढू शकेल, असे येथील काँग्रेसजनांचे मत आहे. कांँग्रेसजनांनी आग्रह लावून धरला तर मात्र बविआचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची डोकेदुखी वाढणार आहे.

- Advertisement -

मतदारसंघ क्रमांक – १३

मतदारसंघ आरक्षण – खुला

- Advertisement -

मतदारांची संख्या

पुरुष – , ५०, ६१५

महिला – , ४०,३२७

एकूण मतदार – ,९०,९४४


विद्यमान आमदार – हितेंद्र विष्णू ठाकूर

हितेंद्र विष्णू ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे आमदार असून त्यांनी २०१४ साली ९७, २९१ मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात उभे असणारे अपक्ष पक्षाचे विवेक पंडित यांचा ३१, ८९६ मतांनी पराभव केला होता. त्यांनी वसई तालुक्यात २२० के. व्ही. आणि १०० के. व्ही. अति उच्चदाबाची उपक्रेंद, २२ के. व्ही. क्षमतेची ५ स्विचिंग स्टेशन्स कार्यान्वित केली आहेत. तसेच सर्व नगरपरिषदांच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालया नगरपरिषदांच्या हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि शासकीय रुग्णालये नगरपरिषदांच्या ताब्यात घेऊन सुसज्ज करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.


पहिल्या पाच उमेदवारांची मतसंख्या

  • हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी – ९७, २९१
  • विवेक पंडित, अपक्ष – ६५,३९५
  • मायकल फुर्टाडो, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस – १६, ४६७
  • मनवेल जोसेफ, अपक्ष – ३, ९८१
  • स्वप्नील नर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – २, ३२९

नोटा – २९६३

मतदानाची टक्केवारी – ६५.५७%


हेही वाचा – पालघर लोकसभा मतदारसंघ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -